इंदापुर तालुक्यामधील वालचंदनगर पोलीस स्टेशन हददीमध्ये वास्तव्यास असणारा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक व धोकादायक गुन्हेगार इसम एम पी डि ए कायदयांतर्गत नागपुर कारागृहात स्थानबध्द.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 16, 2026

इंदापुर तालुक्यामधील वालचंदनगर पोलीस स्टेशन हददीमध्ये वास्तव्यास असणारा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक व धोकादायक गुन्हेगार इसम एम पी डि ए कायदयांतर्गत नागपुर कारागृहात स्थानबध्द..

इंदापुर तालुक्यामधील वालचंदनगर पोलीस स्टेशन हददीमध्ये वास्तव्यास असणारा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक व धोकादायक गुन्हेगार इसम एम पी डि ए कायदयांतर्गत नागपुर कारागृहात स्थानबध्द..
वालचंदनगर:- मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये मागील ५
वर्षाचे कालावधीमधील दाखल गुन्हयामधील जामीनावर मुक्त झालेले आरोपी, तसेच त्यांचे विरुध्द पुन्हा दाखल झालेले गंभीर गुन्हे याचे रेकॉर्ड अदययावत करणेबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले
होते. तसेच सदर रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांची गुन्हेगारी मोडीत काढणेसाठी दरोडा, खुन, खुनाचा प्रयत्न,जबरी चोरी, हायवे रोडवरील लुटमारी करणारे, व्यावसायीकांकडे खंडणीची मागणी करणारे, अवैधपणे अग्नीशस्त्रे
बाळगणारे, सराईत व धोकादायक व्यक्ती यांचे विरुध्द कारवाईचा बडगा उगारून एम. पी. डि.ए कायदयांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण जिल्हयामधील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत.
त्याप्रमाणे वालचंदनगर पोलीस स्टेशन हददीमध्ये वास्तव्यास असलेला धोकादायक इसम नामे अंबादास तायप्पा पवार वय वर्षे 38 रा. चिखली, ता. इंदापुर जि.पुणे याचे विरुध्द यापुर्वी सन 2011, सन 2014, सन 2016,सन 2024, सन 2026 मध्ये बेकायदेशीर गर्दी जमाव जमवुन सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करणे, दरोडा घालण्याची पुर्व तयारी करुन दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे, अवैधपणे बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणे,
संगणमत करुन जबरी चोरी करणे, संगणमत करुन मृत्यु किंवा जबर दुखापत याची भिती घालुन खंडणी मागणे, दरोडा घालणे, जमाव बंदीचा आदेश असताना अवैधपणे बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, संघटीत गुन्हेगारी करुन् कट रचुन दरोडा घालणे, संगणमत करुन घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत करुन खुनाचा प्रयत्न करणे,
बेकायदेशीर गर्दी जमाव जमवुन लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासुन धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करुन इच्छापुर्वक दुखापत किंवा जबर दुखापत पोहवणे व 20 हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक एक लाख रुपयापेक्षा कमी असेल याची हानी अथवा नुकसान करणे असे भारतीय दंड विधान 1860 चे प्रकरण
16 व 17, नवीन भारतीय न्याय संहिता 2023 चे प्रकरण 06 व 17 तसेच भारतीय हत्यार कायदा प्रकरण 5 मधील १० गुन्हे दाखल होते. तो सराईत धोकादायक असल्याने त्याचेविरुध्द एम. पी. डि. ए कायदयांतर्गत कार्यवाही हो
प्रभारी अधिकारी श्री. गोपाळ पवार पोलीस निरीक्षक, वालचंदनगर पोलीस स्टेशन यांनी मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन मा. पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण यांनी करुन तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला होता. मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी, यांनी इसम नामे अंबादास तायप्पा पवार वय वर्षे 38 रा.चिखली, ता. इंदापुर जि. पुणे याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारची कृत्ये करण्यापासुन प्रतिबंध करण्याचे दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपटटीगुंड, हातभटटीवाले, औषधीद्रव्यविषयक
गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती ( व्हिडीओ पायरेटस),वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणा-या, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी
चालवणा-या आणि मानवी अपव्यापार करणा-या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत मुख्य अधिनियम १९८१ चा ( सुधारणा अधिनियम सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९) अन्वये आदेश
पगम/एम पी डि ए/एस आर / १९/०९/२०२६ दिनांक १३/१०/२०२६ अन्वये स्थानबध्द करण्याचा आदेश पारीत केला आहे.

No comments:

Post a Comment