२१ वा महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा - २०२६ चा उद्घाटन समारंभ..
पुणे :- दि.०६/१०/२०२६ रोजी १७.०० वाजता राज्य राखीव पोलीस दल, बल गट क्र. २, पुणे येथील परेड ग्राऊंड येथे प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचे शुभहस्ते संपन्न झाला. श्री. सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गु. अ.वि., पुणे यांनी प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. स्पर्धेत सहभागी २६ संघांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
श्री. दत्तात्रय शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, गुअवि, पुणे यांनी
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ६२ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा लखनऊ उत्तर प्रदेश येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने १२ पदकांची कमाई करुन प्रथम क्रमाकांचा संघ म्हणुन जनरल चॉम्पियन ट्राफी मिळवुन महाराष्ट्र पोलीस दलासाठी ऐतिहासीक कामगिरी केली आहे.
६६ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा, भोपाळ मध्ये पार पडला. महाराष्ट्र राज्य पोलीस
दलाच्या संघाने ११ पदकांची कमाई करुन देशातील द्वितीय क्रमांकाचा संघ म्हणुन रनरअप ट्रॉफी
मिळवुन महाराष्ट्र पोलीस दलासाठी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. ६७ वा अखिल भारतीय पोलीस
कर्तव्य मेळावा, लखनऊ, उत्तर प्रदेश येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने ०७
पदकांची कमाई करुन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. ६८ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा,रांची, झारखंड येथे पार पडला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाच्या संघाने ०४ पदकांची कमाई करुन सुर्या श्वान, सातारा जिल्हा याने गोल्ड मेडल पटकावले आहे. व व्हिडीओग्राफी स्पर्धा प्रकारामध्ये रनरअप ट्रॉफी पटकावलेली आहे. तसेच ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा हा नागपूर,महाराष्ट्र येथे पार पडला. सदर मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने या स्पर्धेमध्ये ११
पदकांची कमाई केली. तसेच पोलीस व्हिडीओग्राफी व घातपात विरोधी तपासणी या स्पर्धांमध्ये Runner up Trophy प्राप्त केली आहे.२१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या विजेते स्पर्धक देखील अशाच प्रकारे उज्वल कामगिरी करुन, आगामी ७० व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये दैदिप्यमान कामगिरी करुन महाराष्ट्र पोलीसांची प्रतीमा उंचावतील अशी आशा व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गतवर्षीच्या ६९ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये पदक
विजेत्या पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा हा ज्ञान, कौशल्य, शिस्त व कर्तव्यनिष्ठेचा उत्सव असल्याचे नमुद केले. आधुनिक काळातील सायबर गुन्हे, आर्थिक फसवणुक व संघटीत गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर पोलीसांना अद्यावत कायदेशीर व तांत्रिक ज्ञान आवश्यक असल्याचे सांगुन गुन्हे अन्वेषण, फिंगरप्रिंट,वैज्ञानिक पुरावे व माहिती तंत्रज्ञानातील स्पर्धांमधुन व्यावसायिक कौशल्य वृदधी होणार असल्याचे नमुद केले. आधुनिक तंत्रज्ञानासोबत मानवी संवेदनशिलता, संयम, सतत शिकण्याची वृत्ती व जनतेचा
विश्वास याचे महत्त्व अधोरेखित केले. पोलीस कर्तव्य मेळाव्यामुळे अधिकारी व अंमलदारांमध्ये
सकारात्मक स्पर्धा, अनुभवाची देवाणघेवाण व संघभावना वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला.स्पर्धकांना निकोप व खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडण्याविषयी मार्गदर्शन करुन आगामी अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरिता शुभेच्छा दिल्या व औपचारिकरित्या स्पर्धेचे उद्घाटन
केले. ६९ व्या अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यामध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक प्राप्त करून देणाऱ्या,श्रीमती सीमा गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई शहर यांना उद्घाटन ज्योत आणण्याचा मान देण्यात आला. २० व्या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळाव्यात जनरल चॅम्पीयनशिप ट्रॉफी पटकविणाऱ्या,नागपूर शहर चे संघ प्रमुख श्री. प्रशांत टावरे, पोलीस निरीक्षक यांनी स्पर्धकांना शपथ दिली.सदर कार्यक्रमास खालील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१. श्री. सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गु.अ.वि., म.रा.,पुणे,
२. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे - पुर्व, गु. अ.वि., म. राज्य, पुणे,
३. श्री. सुधीर हिरेमठ, विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे-पश्चिम, गु.अ.वि., म. राज्य, पुणे,
४. श्री. श्रीकांत पाठक, विशेष पोलीस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गु.अ.वि., म.रा, पुणे,
५. श्री. दत्तात्रय शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, गुअवि, पुणे
६. श्री. अमोघ गावकर, पोलीस उप महानिरीक्षक, प्रशासन, गुअवि, म. रा. पुणे
७. श्री प्रविण पाटील, पोलीस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक, पुणे
८. श्री. रविंद्र परदेशी, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १, पुणे
९. श्रीमती सपना गोरे, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २, पुणे
१०. श्री विवेक पाटील, पोलीस अधीक्षक, (का. व सं.), गु.अ.वि., म.राज्य, पुणे.
११. श्री गणेश पिंगळे, पोलीस उप आयुक्त, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे
तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. २१ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा-
२०२६ मधील स्पर्धांचे आयोजन दिनांक ०५/१०/२०२६ ते १०/१० / २०२६ या कालावधीत राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. १ व गट क्र. २ तसेच महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभाग,महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. विवेक पाटील, पोलीस अधीक्षक, (का. व सं.), गु.अ.वि.,म.राज्य, पुणे, यांनी केले. तसेच सुत्रसंचलन श्रीमती अर्चना कदम, पोलीस निरीक्षक, गु. अ. वि., म.रा.पुणे व श्री. सचिन देवडे, पोलीस नाईक, राज्य राखीव पोलीस बलगट क्र. २ यांनी केले.
No comments:
Post a Comment