बोगस आय पी एस अधीकारी असल्याचे सांगून तरूणास नोकरीचे अमिष दाखवून ७ लाख ८५ हजार रूपयाची फसवणूक करणा-या तोतयास पोलीसांनी केले अटक..
बारामती :-बारामती शहर पोलीस ठाण्याचे हददीतील मौजे डार्लेवाडी ता. बारामती जि. पुणे येथील तरूण आरीफ शहाजहान शेख व त्याचा भाऊ यांना इसम नामे तोसीन इब्राहिम मनियार रा.सय्यद पाटकर वस्ती बारामती ता. बारामती जि. पुणे याने मी आय पी एस अधीकारी आहे असे सांगून मी तुम्हाला माझे ओळखीनी अन्न व प्रशासन विभागात सरकारी नोकरीला लावतो असे म्हणून आरीफ शहाजहान शेख याचे कडून सुमारे ७ लाख ८५ हजार रूपये घेवून खोटे बनावट नोकरीचे प्रमाण पत्र,नियुक्ती पत्र तयार करून देवून त्यांची सन २०२२ ते सन २०२६ चे दरम्यान फसवणूक केली आहे.त्यावावत आरीफ शहाजहान शेख यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला तकार दाखल केले नंतर सदर तक्रारी वरून बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.३८३ / २०२६ बीएनएस ३१८ (४),३१९ (२), ३४० ( २ ), ३, ५ या प्रमाणे दिनांक १५.०९.२०२६ रोजी दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर सदर गुन्हयाचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरु करण्यात आले नंतर गुन्हयातील आरोपी हा पोलीसांना गुंगार देत होता त्याचे अटक बाबत पोलीसांनी योग्य ते प्लॅन तयार करून त्याची माहिती मिळवून तोसीन इब्राहिम मनियार रा. सय्यद पाटकर वस्ती बारामती
ता.बारामती जि. पुणे या बोगस आयपीएस अधिकारी म्हणवून घेणा-यास दिनांक २१.११.२०२६ रोजी अटक केली असून त्याचेकडे गुन्हयाचा तपास चालू आहे.सदर कार्यवाही मा.श्री संदिपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,मा.श्री गणेश बिरादार अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा.श्री चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीमती मनिषा ओमासे परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, महिला पोलीस
अमंलदार भागश्री देवकाते, पोलीस शिपाई विजय ओमासे, पोलीस शिपाई प्रविण शिंगाडे यांनी
सदरची चांगली कामगीरी केलेली आहे.
No comments:
Post a Comment