सावकारकीला कंटाळून एका व्यतीची आत्महत्या,चिट्टीत नावे असल्याने नगरसेवक सह सहाजण अटक, इतर फरार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 18, 2020

सावकारकीला कंटाळून एका व्यतीची आत्महत्या,चिट्टीत नावे असल्याने नगरसेवक सह सहाजण अटक, इतर फरार...

सावकारकीला कंटाळून एका व्यतीची  आत्महत्या,चिट्टीत नावे असल्याने नगरसेवक सह सहाजण अटक, इतर फरार...
बारामती दि.१८:-बारामती मध्ये धक्कादायक घटना घडली एका व्यापारी इसमाने चक्क सावकारीपायी आत्महत्या केली असल्याची चिट्टी लिहिल्याने गुन्हा दाखल झाला असून याबाबत सविस्तर असे,प्रतिक प्रितम शहा वय ३० वर्षे व्यवसाय व्यापार रा. सहयोग सोसायटी प्लॅट नं.३४ बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या तकारी वरून बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५६८/२०२० भा.द.वि.क. ३०६,५०६,३४ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे.कमल.३२(१)(२),३९,४५ अन्वये दिनांक १८/११/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. असून आरोपीची नावे 
 १) जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे रा.भिगवण रोड बारामती २) जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे देशमुख रा.देशमुख वस्ती पाटस रोड बारामती ३) संजय कोंडिबा काटे रा.काटेवाडी ता.बारामती ४) विकास नागनाथ धनके रा इंदापुर रोड ५) मंगेश ओंबासे रा. सायली हिल बारामती एमआयडीसी ६) प्रविण दत्तात्रय गालिंदे रा.खाटीक गल्ली बारामती ७) हनुमंत सर्जेराव गवळी रा.अशोकनगर जैन मंदीराशेजारी बारामती ८) संघर्ष गव्हाळे रा.बारामती ९) सनी उर्फ सुनिल आवाळे रा. खंडोबानगर बारामती यांनी मयत नामे प्रितम शशीकांत शहा यांना व्याजाने पैसे देवुन दिलेल्या पैशाच्या व्याजाचे वसुलीसाठी तसेच सहयोग सोसायटी येथील बंगला व्याजाच्या पोटी नावावर करून घेवुन मयतास मानसिक त्रास देवुन आत्महत्यास प्रवृत्त केलेबाबत यातील मयत प्रितम शहा यांनी त्यांचे हस्ताक्षरात वरील लोकांची नावे लिहुन सुसाईट नोट करून ठेवलेली होती.

 त्यावरून मयताचा मुलगा प्रतिक प्रितम शहा याने दिलेल्या तकारी वरून वरील इसमांवरती बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात १) जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे रा.भिगवण रोड बारामती २) जयसिंग उर्फ बबलु अशोकराव काटे देशमुख रा. देशमुख वस्ती पाटस रोड बारामती ३) संजय कोंडिबा काटे रा.काटेवाडी ता.बारामती ४) प्रविण दत्तात्रय गालिंदे रा.खाटीक गल्ली बारामती ५) हनुमंत सर्जेराव गवळी रा.अशोकनगर जैन मंदीराशेजारी बारामती ६) सनी उर्फ सुनिल आवाळे रा.खंडोबानगर यांना अटक करण्यात आलेली असुन ७) विकास नागनाथ धनके रा.इंदापुर रोड, ८) मंगेश ओंबासे रा.सायली हिल बारामती एमआयडीसी बारामती ९) संघर्ष गव्हाळे रा.बारामती हे सदर गुन्हयात फरारी आहेत.सदर गुन्हयाचा पुढील तपास मा.श्री. डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण मा.श्री. मिलींद मोहिते अपर पोलीस अधिक्षक सो,बारामती मा.श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो,बारामती उपविभाग यांचेमार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

वरील लोकांकडून कोणाला व्याजाच्या पैशासाठी मानसिक त्रास होत असेल तर त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे तकार देणेस समक्ष यावे असे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment