बार्टी मार्फतसंघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२०उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एकावेळी एकरकमी रक्कम रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य योजना जाहिर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 20, 2020

बार्टी मार्फतसंघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२०उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एकावेळी एकरकमी रक्कम रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य योजना जाहिर

बार्टी मार्फतसंघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२०उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एकावेळी एकरकमी रक्कम 
रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य योजना जाहिर 

पुणे:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकारिता स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता (UPSC) दर वर्षी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा -२०२०, दि. ०४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आली. व परीक्षेचा निकाल दि. २३/१०/२०२० रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. 
या वर्षी सन २०२० मध्ये अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीचे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकावेळी एकरकमी रक्कम रु.५०,०००/- आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. 
बार्टी मार्फतमुख्य परीक्षे करिता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर भेट देऊन पात्रतेचे स्वरूप तपासून, अर्ज डाऊनलोड करून व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जामध्ये असलेल्या ई-मेल वर दि.०८/१२/२०२० रोजी सायंकाळी५.३०वाजेपर्यंत अर्ज पाठविण्यात यावेत असे आवाहन मा. महासंचालक, श्री. धम्मज्योती गजभिये, बार्टी, पुणे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment