अबब! रुग्ण हक्क परिषदेने केले तब्बल दहा लाख रुपयांचे हॉस्पिटलचे बील माफ... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

अबब! रुग्ण हक्क परिषदेने केले तब्बल दहा लाख रुपयांचे हॉस्पिटलचे बील माफ...

*अबब! रुग्ण हक्क परिषदेने केले तब्बल दहा लाख रुपयांचे हॉस्पिटलचे बील माफ*

*पुणे(प्रतिनिधी):-पुण्यातील धानोरी येथील सौरभ बावस्कर यांची आई सुषमा पावसकर यांना गेल्या एक महिन्यापूर्वी हृदय आणि किडनी रोगावर उपचारांसाठी पुण्यातील डेक्कन जवळील एका मोठ्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सुमारे दहा लाख रुपये इतका मोठा खर्च आला. सर्व नातेवाईक जवळचे मित्र मंडळ यांच्याकडे पैशांसाठी मागणी केली, मात्र तरीही अनेक विविध कारणे देत पैसे जमू शकले नाहीत.
      सौरभ पावस्कर विद्यार्थीदशेत आहेत त्यांच्या दोन्ही बहिणींची लग्न झालेली आहेत. अशांमध्ये आईचे उपचारांसाठी लागणारे दहा लाख रुपये आणायची कुठून ? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता त्यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांची त्यांनी भेट घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठे, केंद्रीय सचिव दीपक पवार, जिल्हा प्रभारी गिरीश घाग, शहर सरचिटणीस एडव्होकेट सचिन गायकवाड, नितीन चाफळकर यशस्विनी नवघणे, उमा नवघणेसह पुणे शहर कमिटीतील अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहून त्यांचे सहा लाख रुपयांचे बिल माफ करून दिले. सौरभ बावसकर यांनी रुग्ण हक्क परिषदेचे आभार मानले. आणि मी सुद्धा रुग्ण हक्क परिषद काम करणार असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते.

No comments:

Post a Comment