ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या विजयी उमेदवारांची धाकधूक आणखी महिनाभर .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या विजयी उमेदवारांची धाकधूक आणखी महिनाभर ..

ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या विजयी उमेदवारांची  धाकधूक आणखी महिनाभर ..

कोल्हापूर:- नुकताच  ग्रामपंचायत निवडणूक झाली,सरपंच पदाची आरक्षण सोडत बाकी असल्याने बहुमत मिळूनही ग्रामपंचायत ताब्यात आल्याची अनेकांना शाश्वती नाही

एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदांचे आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दुपारी दिली. पुढील एक महिन्यात ही आरक्षण सोडत काढली जाईल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. मात्र आरक्षण सोडत बाकी असल्याने बहुमत मिळूनही ग्रामपंचायत ताब्यात आली याची अनेकांना शाश्वती नाही. त्यामुळे विजयी उमेदवारांची व पँनल प्रमुखांची धाकधूक कायम राहणार आहे.

११ डिसेंबर रोजी सरपंचपदांच्या आरक्षण सोडती निवडणूक निकालानंतर काढाव्यात, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. मात्र तत्पूर्वी काही जिल्ह्यांत आरक्षण सोडती झाल्या होत्या. त्या रद्द करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच कोरोनाचे कारण पुढे करून आरक्षण सोडत निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गावपातळीवरील अनेक दिग्गज नेत्यांचा हिरमोड झाला होता. आता आणखी महिनाभर सरपंच पदाचे आरक्षण लांबणीवर पडल्या मुळे विजयी पँनल प्रमुखांना निवडणूक आलेल्या उमेदवारांचे चोचले पुरवावे लागणार आहेत .आणि ऐवढे होऊन ही सरपंच पदाची माळ गळ्यात पडण्याचे योग कुणाचा येईल हे निश्चित नाहीत .

No comments:

Post a Comment