मोडकळीस आलेल्या ऐतिहासिक भिडे वाड्याची दुरवस्था आणि पडझडीला खासदार गिरीष बापट जबाबदार - उमेश चव्हाण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 4, 2021

मोडकळीस आलेल्या ऐतिहासिक भिडे वाड्याची दुरवस्था आणि पडझडीला खासदार गिरीष बापट जबाबदार - उमेश चव्हाण

*मोडकळीस आलेल्या ऐतिहासिक भिडे वाड्याची दुरवस्था आणि पडझडीला खासदार गिरीष बापट जबाबदार -  उमेश चव्हाण*

पुणे:-क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी पत्नी  सावित्रीबाई फुले यांना शिकवले.   १ जानेवारी १९४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा त्यांनी  सुरु केली. ब्राम्हणी - सनातनी व्यवस्थेला सुरुंग लावून स्त्रीयांना शिक्षित करण्याचे महान कार्याची फुले दांपत्याने ऐतिहासिक सुरुवात केली. आज तोच ऐतिहासिक भिडेवाडा गर्दुल्ले आणि दारुड्यांचा अड्डा झालाय. यामुळे तमाम देशवासीयांच्या संतप्त भावना आहेत.
       अंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून जो भिडेवाडा जगाला प्रेरक ठरणार होता तोच येथील अपरिपक्व राजकारण्यांमुळे मोडकळीस आलाय, एक पवित्र ऐतिहासिक वास्तूची पडझड विद्यमान खासदार गिरीष बापट यांच्यामुळेच झाली असल्याचा गंभीर आरोप रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी आज केला.
        ३ जानेवारीला दरवर्षी महात्मा सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी होते, १ जानेवारीला पहिली मुलींची शाळा म्हणून भिडेवाड्याला भेट देताना मान शरमेने खाली जाते. गिरीष बापट विद्यमान खासदार आहेत. बापट १९९५ रोजी पहिल्यांदा आमदार झाले. ते पुण्याचे पालकमंत्री होते. २०१८ साली नागपूर पावसाळी अधिवेशनात भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करू आणि त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी विधानसभेत वल्गनाच केली. 
       आज गिरीष बापट पुण्याचे कारभारी आहेत, शंभर नगरसेवकांची महानगरपालिका त्यांच्या हाती आहे. केंद्राकडूनही त्यांना निधी मिळेल, मात्र खासदार गिरीष बापट यांनी भिडेवाडा सडवलाच सोबत मोडकळीसही आणला आहे. देशवासीयांनी डोळे उघडून वास्तव बघितले तर भाजप आणि आरएसएस किती जातीयवादी आणि बेजबाबदार राजकारणी आहेत हे दिसेल असेही उमेश चव्हाण म्हणाले.
        खासदार गिरीष बापट यांनी आता प्रायश्चित्त म्हणून तरी तत्काळ भिडेवाडा स्मारक विकास संवर्धन काम सुरु करावे, अन्यथा रुग्ण हक्क परिषद, पुणे शहर कमिटी खासदार गिरीष बापट यांच्या निवासस्थानी मोर्चा काढेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला.

No comments:

Post a Comment