बारामतीत नऊ वर्षाच्या बालिकेवर नात्याने भाऊ लागणाऱ्या नराधमाने केला अत्याचार... बारामती:- एका मागून एक घटना घडत असल्याने बारामतीत चाललंय काय असे म्हणण्याची वेळ आली आहे, नुकताच धक्कादायक प्रकार घडला नात्याने भाऊ असण्याऱ्या नराधमाने चक्क गैर कृत्य केले, बारामती तालुक्यातील उंडवडी परिसरात ही अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका पंचवीस वर्षीय तरुणास अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.उंडवडी परिसरात या नराधमाने नात्याने बहीण लागत असलेल्या अवघ्या नऊ वर्षाच्या मुलीला मक्याच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केले.याबाबत मुलीच्या आई वडिलांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीची तातडीने दखल घेत सपोनि. सोमनाथ लांडे, आणि त्यांच्या टीम ने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने
नात्याने बहीण लागतं असलेल्या चिमुकलीशी दुष्कर्म केले असल्याने उंडवडी परिसरात संतापाची लाट उसळली आहे.आरोपीला बारामतीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहितीतपासअधिकारी शेलार यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाय. ए. शेलार करीत आहेत.या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment