निरावागजच्या सरपंच पदी सौ.विद्या दत्तात्रय भोसले यांची निवड - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 1, 2021

निरावागजच्या सरपंच पदी सौ.विद्या दत्तात्रय भोसले यांची निवड

निरावागजच्या सरपंच पदी सौ.विद्या दत्तात्रय भोसले यांची निवड

निरावागज:-नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निरावागज गावच्या सरपंच पदी सौ.विद्या दत्तात्रय भोसले यांची व मा.संग्रामसिंह विश्वासराव देवकाते यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी एक एकाच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस.मारकड यांनी दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. या निवडणुकीत पंधरा सदस्य संख्या असणाऱ्या या निरावागज गावाने युवकांबरोबरच अनुभव असणाऱ्या माझी पदाधिकाऱ्यांना देखील संधी देण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत वाघेश्वरी माता ग्राम विकास पॅनल ला १५ पैकी १४ जागा मिळवत घवघवीत यश मिळाले तर एक उमेदवार सौ. ललिता भोसले या अपक्ष निवडून आल्या. 
             यावेळी गावचे नेते विश्वासराव देवकाते, मदन नाना देवकाते, संपतराव देवकाते, राजाभाऊ देवकाते, गणपतराव देवकाते, लक्ष्मण भोसले, यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गुलाब देवकाते, सुरेश देवकाते, विलास देवकाते, सुनील देवकाते, ज्ञानदेव देवकाते, रमेश देवकाते, राजेंद्र कुंभार, नामदेव मदने, सोमनाथ भोसले, चंद्रराव देवकाते, गोविंद देवकाते, राजेंद्र भोसले, ज्ञानदेव बुरुंगले, गावचे पोलीस पाटील अमित देवकाते, ग्रामविकास अधिकारी कैलास कारंडे, तसेच शितल भोसले, रतनकुमार भोसले, राजु भोसले उपस्थित होते. नवनिर्वाचित सदस्य ॲड.हेमंत देवकाते यांनी गावचे काम पारदर्शक पणे करू अशी ग्वाही दिली. गावाच्या सरपंच सौ.विद्या भोसले यांच्या वतीने रोहित भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment