अखेर कुविख्यात गुंड बाळया दराडे याच्या आवळल्या मुसक्या, बारामती तालुका पोलिसांची कारवाई - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 1, 2021

अखेर कुविख्यात गुंड बाळया दराडे याच्या आवळल्या मुसक्या, बारामती तालुका पोलिसांची कारवाई

अखेर कुविख्यात गुंड बाळया दराडे याच्या आवळल्या मुसक्या, बारामती तालुका  पोलिसांची कारवाई

बारामती:-कुविख्यात गुंड बाळया दराडे याच्यावर बारामती तालुका, बारामती शहर, भिगवन, वालचंदनगर,शिरवळ, फलटण,कराड पोलीस ठाण्यात तसेच गुजरात राज्यामध्ये मोक्का, खुनाचा प्रयत्न पोलीसांवर पिस्तूलाने
रोखणे,दरोडा,घरफोडी,मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन त्याच्या मागावर संपूर्ण पुणे ग्रमिण पोलीस तसेच सातारा पोलीस होते .परंतू तो राजस्थान ,गुजरात,मध्य प्रदेश या राज्यात लपून मागील २ वर्षापासून पोलीसांना
गुंगारा देत होता. पोलींसानी त्याची माहिती देणा - यास गेख ५० हजार रूपंयाचे बक्षीस जाहिर केले होते.काल रोजी तो पंचवटी,नाशिक या ठिकाणी येणार असल्याची गोपनीय माहिती बारामती तालुका पोलीसांच्या गुन्हे शोध पथकास मिळाली होती. सदरची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीसाच्या गुन्हे शोध पथकाने पंचवटी
,नाशिक येथे जावून बाळया दराडे व त्याचा साथीदार विजय गोफणे यांना ताव्यात घेवृन अटक केलेली आहे.बाळा दराडे व विजय गोफणे यांच्यावर पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) बारामती तालुका पोलीस ठाणे गु.र.२१५/२० भादवि कलम ३०७, ३२३, ३४१,३५ सह आर्म अंक्ट ३/२५(फरारी )
२) बारामती तालका पोलीस ठाणे गु.र.६१५/१७ भादवि कलम १६०
३) बारामती शहर ठाणे गु.र.६९/२० भादवि कलम ३६५,३३०,५०४,५०६,३४ ( फरारी )
४) बारामती शहर ठाणे गु.र २/१८ शस्त्रनियम अधिनियम कलम ५/ २५
५) भिगवण पोलीस ठाणे गु.र.२६/ २० भादवि कलम ३०७, ३९७,३२३, ५०४,५०६,३४ सह आर्म अंक्ट ३/२५,
४/२५,(फरारी )
६) भिगवण पोलीस ठाणे गु.र.२७०/२० आर्म अॅक्ट ३/ २५ ( फरारी )
७) भिगवन पोलीस ठाणे ४३०/२० कलम ३०७, ३९७, ३२३, ५०४,५०६,३४ सह आर्म अॅक्ट ३/२५,मोक्का
अॅक्ट (फरारी )
८) फलटण शहर पोलीस ठाणे.गु.र १८२/१४ भादवि कलम ४५४,३८०
९)शिरवळ पोलीस ठाणे.गु.र १९५/१८ भादवि कलम ४५४,३८०,३४
१०) सातारा शहर पोलीस ठाणे.गु.र ६०७/ १४ भादवि कलम ४५४,३८०,
११) सातारा शहर पोलीस ठाणे.गु.र २०/१४ भादवि कलम ३८७,३०७, ५०६(२), आर्म अॅक्ट ३,२५
१२) कराड पोलीस ठाणे गु.र.क १२३/१४ कलम ३८०,४५७
१३) नरोला पोलीस ठाणे अहमदाबाद,गुजरात गु.र.क ३०७/२०१८ आर्म अँक्ट ५/२५
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हवालदार दादा ठोंबरे ,कॉन्टेबल विनोद लोंखंडे, नंदू जाधव,राहूल पांढरे,विजय वाघमोडे, रणजीत मुळीक,अमोल नरूटे यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment