तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी माफी साठी प्राचार्यांकडे मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 12, 2021

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी माफी साठी प्राचार्यांकडे मागणी

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी माफी साठी प्राचार्यांकडे मागणी
 
 बारामती:-  दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती मधील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने काही विद्यार्थी प्राचार्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी वापरात न आलेल्या सुविधांची फी घेऊ नये म्हणून निवेदन दिले. 
        काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या  द्वारे Google Form तयार करून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची फी माफ करणे बाबत मते मागवून घेतली होती. त्यामध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरून कसल्याही प्रकारची फी घेऊ नये असे सांगत याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली त्याच अनुषंगाने आज प्राचार्यांना भेटून हे निवेदन सादर करण्यात आले.
    लायब्ररी, क्लास रूम,  प्रॅक्टिकल ल्याब, जिम, स्पोर्ट्स आणि इतर बऱ्याच सुविधा एकत्र करून विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाते. परंतु या वेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिलेल्या पैकी कोणत्याच सुविधेचा वापर विद्यार्थ्यांनी केला नाही. त्यामुळे यासाठी लागणारी कोणत्याही प्रकारची फी घेण्यात येऊ नये. तसेच ज्यांची फी घेण्यात आलेली आहे ती परत करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी आग्रह करू नये असे यावेळी त्यांना सांगण्यात आले. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय न घेतल्यास सर्वच विद्यार्थ्यांना घेऊन मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ही यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला अशी माहिती विद्यार्थी रोहित भोसले यांनी दिली.
       
   - प्राचार्यांना सांगून विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढू असे आश्वासन यावेळी उपप्राचार्यां डॉ.जगदीश देशपांडे सर यांनी दिले. 
 यावेळी रोहित भोसले, प्रथमेश काशिद, ऋतिक महामुनी तसेच इतर विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment