फुले-आंबेडकर जयंती निमित्त बारामतीत रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

फुले-आंबेडकर जयंती निमित्त बारामतीत रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

*फुले-आंबेडकर जयंती निमित्त बारामतीत रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न*

बारामती दि.१३ : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त "रक्तदान करुनी,महामानवांना अभिवादन करूया" या अभियाना अंतर्गत सोमवार दि.१२ एप्रिल रोजी बारामती येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये एकूण १७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

बारामती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले.यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,किशोर सोनवणे उपनगराध्यक्ष अभिजित जाधव,नगरसेवक किरण गुजर,गणेश सोनवणे,राजेंद्र बनकर,बिरजू मांढरे,नवनाथ बल्लाळ,नगरसेविका मयुरी शिंदे,अनिता जगताप,निता चव्हाण माजी नगरसेवक अभिजित चव्हाण,सुरज शिंदे,काळुराम चौधरी,बबलू जगताप,सचिन साबळे,राहुल कांबळे,फैयाज शेख,बा.न.प चे आरोग्य निरक्षक राजेंद्र सोनवणे,बबन लोंढे,श्याम जाधव,अनिल मोरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

ज्या महामानवांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी खर्ची केले.त्या महामानवांच्या कार्यापासूनच प्रेरणा घेऊन.कोविड-१९ सारख्या महाभयंकर आजाराच्या संकटातून महाराष्ट्र जात असताना.राज्यात रक्ताचा तुटवडा पडत असताना.बारामतीतील समाज बांधवानी रक्तदान करून खऱ्या अर्थाने मानव कल्याणाचे काम करून या महामानवांना अभिवादन केले आहे.दिवसभर सुरु असलेल्या या रक्तदान शिबिराला प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे,मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी भेट देत.या उपक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी ॲड.सुशिल अहिवळे,गौतम शिंदे,प्रा.रमेश मोरे,सचिन काकडे,गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे,शुभम अहिवळे,शंकर गव्हाळे,चेतन शिंदे,चंद्रकांत भोसले,कैलास शिंदे,सिद्धार्थ शिंदे,मनोज केंगार,सचिन जगताप,कृष्णा सोनवणे,सुशिल भोसले,प्रा.निळकंठ ढोणे,राहुल सोनवणे भास्कर दामोदरे यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान गेल्या दोन वर्षात आमचे कुठलेच कॅम्प ६० रक्तदात्यांची वरती गेले नाहीत.कोविड-१९ च्या काळात देखील या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल १७१ जणांनी रक्तदान केल्यामुळे गेल्या २ वर्षांच्या आमच्या ब्लड बँकेच्या इतिहासातील हे उच्चांकी रक्तदान शिबीर असल्याचे ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment