सावता परिषदेच्या वतीने विचार पर्व व्याख्यानमालेचे फेसबुक लाईव्ह आयोजन -सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे करणार उदघाटन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

सावता परिषदेच्या वतीने विचार पर्व व्याख्यानमालेचे फेसबुक लाईव्ह आयोजन -सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे करणार उदघाटन

सावता परिषदेच्या वतीने विचार पर्व व्याख्यानमालेचे फेसबुक लाईव्ह आयोजन -
सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे करणार उदघाटन
-----------------------------------------------------------
बीड - (प्रतिनिधी)  क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सावता परिषदेच्या वतीने महापुरूषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी दि. ११ ते १४ एप्रिल दरम्यान विचार पर्व व्याख्यानमालेचे फेसबुक लाईव्हद्वारे आयोजन करण्यात आले  आहे.आज दि.१० एप्रिल रोजी सायं. ७ वा. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजयराव मुंडे उदघाटन  करणार असुन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे  या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
       कोरोनाच्या कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीमुळे सावता परिषदेच्या वतीने फेसबुक लाईव्हद्वारे जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सावता परिषद या फेसबुक पेजवरून लाईव्ह होणा-या या विचार पर्व व्याख्यानमालेत नामांकित व प्रतिभावंत व्याख्यात्यांची व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दि.११ एप्रिल रोजी सायं. ७ वा. पुरोगामी विचारवंत व नामवंत साहित्यिक प्रा. प्रल्हाद लुलेकर हे 'बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा जोतीराव फुले' या विषयावर विचार मांडून गुंफणार आहेत.दि.१२ एप्रिल सायं. ७ वा. 'फुले - शाहु - आंबेडकर यांचे शेतीविषयक धोरण' याविषयावर ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते तथा अ.भा.किसान सभेचे उपाध्यक्ष कॉ.राजन क्षिरसागर हे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. दि.१३ एप्रिल सायं. ७ वा. प्रसिद्ध व्याख्याते तथा फुले- शाहु- आंबेडकर विचारधारेचे प्रभावी प्रचारक प्रा. रघुनाथ यादव हे 'फुले - शाहु - आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार व सद्य परिस्थिती' या विषयावर विचार व्यक्त करून तिसरे पुष्प गुंफणार आहेत तर परिवर्तनवादी कवयित्री तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट सदस्या प्रा.डॉ. प्रतिभा आहिरे या 'फुले - शाहु - आंबेडकर यांचे महिलाविषयक विचार व आजची परिस्थिती' या विषयावर व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफणार आहेत.
                सदरील विचार पर्व व्याख्यानमाला ही एक वैचारिक पर्वणी ठरणार असुन फुले-शाहु-आंबेडकर विचारधारेचे पाईक असणा-यासाठी  एकप्रकारे मेजवानी आहे. तरी या विचार पर्व व्याख्यानमालेचा तमाम बांधवांनी सावता परिषद या फेसबुक पेज वरून लाईव्ह लाभ घ्यावा असे आवाहन सावता परिषदेचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment