शुक्रवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन (कडक निर्बंध) जाहीर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

शुक्रवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन (कडक निर्बंध) जाहीर

शुक्रवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन (कडक निर्बंध) जाहीर                  

पुणे:-महाराष्ट्रातील वाढता कोरोना व्हायरसचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात शुक्रवारी सायंकाळपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन (कडक निर्बंध) जाहीर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात यापुर्वीच
जिल्हाधिकार्यांनी आदेश काढून जिल्ह्यात काय
चालु आणि काय बंद राहील हे सांगितले आहे.
दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश
देशमुख यांनी आज सुधारित आदेश काढला आहे. त्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व
क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद,
नगरपंचायत आणि छावणी परिषद हद्दीत शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत काय सुरू आणि काय बंद राहील हे खालील प्रमाणे
नमुद करण्यात आले आहे.पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांना / परीक्षार्थींना सर्व प्रकारच्या परीक्षा / स्पर्धा परीक्षेकरिता घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत /परीक्षा केंद्रापासून घरापर्यंत सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 ते सकाळी 7 पर्यंत तसेच शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत(संचारबंदीच्या काळात) प्रवास परवानगी राहणार आहे. परीक्षार्थी सोबत त्यांचे करण्यास पालक यांना देखील प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रवास करताना सोबत परीक्षेचे हॉल तिकिट बाळगावे तसेच या सवलतीचा गैरवापर टाळावा.
2. शुक्रवार सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7
वाजण्याच्या या संचारबंदीच्या काळात मेडिकल,दुध विक्री दुकाने वगळून सर्व दुकाने बंद
राहतील. दुध विक्रीची दुकाने सकाळी 6 ते 11
या वेळेत सुरू राहतील.3. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा पुरवठा करणारे कंपनी (ई-कॉमर्स, उदा. स्विगी, झोमॅटो आणि इत्यादी) यांना आठवडयातील सर्व दिवस प्रवास करण्यास परवानगी राहील. शुक्रवार सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 या संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांना हॉटेलमध्ये जावून पार्सल घेण्यास प्रतिबंध राहील. हॉटेल,
रेस्टॉरंगट, बार मार्फत घरपोच पार्सल सेवा सुरू
राहील. 4. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रात घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी,ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणार्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस /नर्स यांना आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी राहणार आहे. 5. स्पर्धा परीक्षा असल्यामुळे पुणे जिल्हा ग्रामीण
कार्यक्षेत्रातील खानावळी (मेस) या फक्त पार्सल
सेवेसाठी सर्व दिवस सकाळी 7 ते सायंकाळी 8
या वेळेत सुरू राहतील.6. लसीकरण सुविधा आठवडयातील सर्व दिवस सुरू राहील.
7. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रामधील ज्या
बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची
व्यवस्था (एन सिटू लेबर) आहे असे बांधकाम
शनिवार आणि रविवार सुरू ठेवता येतील.
৪. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील मद्य
विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या
नियमाप्रमाणे. होम डिलीव्हरी सुविधा - सोमवार
ते शुक्रवार राज्य उत्पादन शुल्क विभागाने
विहीत केलेल्या वेळेनुसार सुरू राहील.
9. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील चष्म्याची
दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते
सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. 10. पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक (पीएमपीएमएल बस सेवा)
अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार व रविवार
बंद राहील. मात्र ओला आणि उबेर यासारख्या
टॅक्सी सेवा अत्यावश्यक कारणासाठी सुरू
राहतील.11. या कार्यालयाकडील दि. 5 एप्रिल 2021अन्वये ज्या उद्योग / आस्थापना यांनी त्यांचे कर्मचार्यांची कोविड-19 निगेटिव्ह
(आरटीपीसीआर) प्रमाणपत्र सोबत ठेवण्याचे आदेशित केले आहे. तसेच त्यांना रॅपिड अँटीजन टेस्ट करून कोविड-19 निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगणेस देखील परवानगी राहील. 11. या कार्यालयाकडील दि. 5 एप्रिल 2021अन्वये ज्या उद्योग / आस्थापना यांनी त्यांचे कर्मचार्यांची
कोविड-19 निगेटिव्ह(आरटीपीसीआर) प्रमाणपत्र सोबत ठेवण्याचे आदेशित केले आहे. तसेच त्यांना रॅपिड अँटीजन टेस्ट करून कोविड-19 निगेटि्ह प्रमाणपत्र बाळगणेस देखील परवानगी राहील.12. सदर आस्थापनावरील कर्मचारी यांनी भारत सरकारव्दारे निर्गमित केलेल्या मार्गदर्शक
सूचनानुसार लवकरात लवकर लसीकरण करून
घ्यावे. तोपर्यंत त्यांनी कोविड-19 निगेटिव्ह
(आरटीपीसीआर / आरएटी) असल्याचे 15
दिवसांची वैधता असणार सर्टिफिकेट सोबत
बाळगणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन
करणार्या व्यक्तीकडून दंडात्मक कारवाई
करण्यात येईल.

No comments:

Post a Comment