'CMIS' पोहोचविणार पोलिसांना गुन्हेगारांच्या घरापर्यंत!
बारामती:-पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या CMIS APP चा वापर रेकॉर्ईवरील गुन्हेगारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आता आधुनिक तंत्र्यान मदत घेणार आहे . रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा पत्ता व इतर माहिती एकत्रित करून ती एका मोबाईल अपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.कोल्हापूर परिश्षेत्र चे पोलीस महानिरीक्षक श्री. मनोज लोहिया यांच्या संकल्पनेतून
सी एम आय एस हे नवे मोबाईल अप विकसित करण्यात आले असून शनिवारी दि. २५ सप्टेंबर रोजी याचे प्रत्याक्षित, मा. श्री अजित दादा पवार यांच्या उपस्थित बारामती येथे पार पडले व पोलीस दला साठी software चे हस्तांतरण करण्यात आले आहे.या वेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मनोज लोहिया, पिपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश पुणे ग्रामीण SP , सोलापूर ग्रा. SP , रायगड चे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे , पुणे ग्रा. अप्पर पो. अ. मितेश घाटे व
मिलिंद मोहिते आणि CMIS software बनवणारी । mark Technology चे संचालक मंगेश शितोळे उपस्थित होते.पहिल्या टप्प्यात software मध्ये रेकॉर्डवरील मालाविषयक गुन्हेगारांची सर्व माहिती भरून घराचे पत्ते, व अद्यावत फोटो भरले जाणार आहेत. यामुळे बदलून आलेल्या अधिकारी/कर्मचारी ला आरोपीचे नेमके राहण्याचे ठिकाण कळण्यास मदत होणार.सदर app प्रायोगिक तत्वावर विकसित करण्यात आला असून त्याचे प्रत्याक्षित काल पार पड़ले, स्वतः महानिरीक्षक यांनी सर्व अधिकाऱ्याची व software बनवणारी कंपनी I Mark Technology, सोलापूर चे संचालक श्री मंगेश शितोळे यांच्या सोबत बैठक घेऊन त्यातील माहिती बाबत येणाच्या त्रुटी बाबत विचारणा केली व गरजेनुमार बदल करण्यास सांगितले आहे.सर्व नावे app मध्ये माहिती कशा पद्धतीने भरली जावी आणि बिनचूकपणा असावा याबाबत सुचना दिल्याचे समजते. लवकरच सांगली,सातारा ब कोल्हापूर मधील गुन्हेगारांची माहिती सुद्धा या software मध्ये समाविष्ट होऊन app कार्यान्वित होणार असल्याचे
पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ब्रिटीश काळापासून पोलीस प्रशासन हिस्ट्री शीट तयार केले जाते. मात्र बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना कमी वेळेत आरोपींची संपूर्ण व
अचूक माहिती मिळावी हा या मागचा उद्देश आहे.
ठळक वैशिष्ठे :प्रत्येक आरोपीच्या घराचे लोकेशन (अंतर सहित).आरोपींचा Digital Criminal Photo Album.घटक निहाय व गुन्हे पद्धती नुसार गुन्हेगारांची यादी.तडीपार गुन्हेगारांची घटक निहाय माहिती.
No comments:
Post a Comment