*हातगाड्यांवर फिरून भाजी विक्री करणार्या इसमावर विकृत मनोवृत्तीच्या इसमाचा जीवघेणा हल्ला*
बारामती(संतोष जाधव ):-दिनांक 13 11 21 रोजी सकाळी साडे नऊ च्या दरम्यान लक्ष्मी नगर कसबा याठिकाणी फारुख इसाप तांबोळी वय 55 वर्ष हे लक्ष्मीनगर परिसरामध्ये हात गाड्यावर भाजी विक्रीसाठी गेले त्यावेळेस विक्षिप्त मनोवृत्तीचा युवक अनिकेत सुरेश शिंदे वय 22 वर्ष राहणार लक्ष्मी नगर हा त्या ठिकाणी आला व त्याने दारू पिण्यासाठी वीस रुपयाची मागणी भाजी विक्रेत्याकडे केली आणि त्यानंतर फारुख यांना काही कळण्याच्या आत मधेच त्याने पाठीमागून ऍडजेस्ट टेबल पाहणा लहान मेंदू जवळ डोक्यात मारला सदर मार लागल्यामुळे फारुख तांबोळी हे त्याठिकाणी बेशुद्ध झाले त्यांना सुरुवातीला सिल्वर जुबली हॉस्पिटल व नंतर निंबाळकर हॉस्पिटल या ठिकाणी तात्काळ दाखल करण्यात आले परंतु ते बेशुद्ध अवस्थेत होते दवाखान्यात पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी फारुख यांच्या प्रकृतीची जाऊन पाहणी केली तसेच घटनास्थळी भेट दिली,त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे या ठिकाणी रवानगी करण्यात आलेली आहे आरोपी अनिकेत शिंदे याला त्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले सदर इसम पळून जात असताना त्याच्या हि डोक्यामध्ये मार लागलेला आहे सदर इसमाला पोलीस ठाण्यात आणून चौकशी करून तात्काळ त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जखमी इसम फारुख यांच्या पत्नीची फिर्याद घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. सदर अनिकेत शिंदे यांच्या विक्षिप्त वागण्याबद्दल लक्ष्मीनगर भागात अनेक लोकांच्या तक्रारी आहेत त्याच्यावर खुनाचा प्रयत्न चा गुन्हा दाखल केलेला आहे सदर इसमास अटक करून त्याला कोणत्याही प्रकारे पुढील अनेक वर्षे जमीन होणार नाही यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत तसेच त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून स्थानिक लोकांना त्याच्या पासून होणाऱ्या त्रासासाठी पोलीस प्रतिबंध करणार आहेत. सदर इसमला दोन दिवस पोलिस कस्टडी मिळाली आहे. सदर जखमी इसमाची परिस्थिती हलाखीची असल्याने दानशूर व्यक्तीने त्याच्या उपचारासाठी मदत करावी असे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे हे करत आहेत. सदर आरोपीला गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी तात्काळ ताब्यात घेतले बारामती शहर पोलीस ठाण्यात आरोपींची कुंडली तयार केली जाणार यापुढे पूर्वी आरोपीने गुन्हे केलेले आहेत त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींनी परत जर गुन्हा केला तर त्याच्यावर झोपडपट्टी दादा कायदा किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे तरी पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या आरोपी बरोबर नवीन आरोपींनी जरी गुन्हा केला तरी त्याला सुद्धा याच कायद्याने कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वसामान्य माणसांनी गुन्हेगारी व्यक्तीच्या कारवाई मध्ये सामील होऊ नये व आपले भविष्य खराब करून घेऊ नये असेही आव्हान सर्व तरुणांना करण्यात येत आहे.अशी माहिती सुनील महाडिक पोलीस निरीक्षक बारामती शहर यांनी दिली.
No comments:
Post a Comment