वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीला वेग* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, November 14, 2021

वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीला वेग*

*वार्षिक निरंकारी संत समागमाच्या पूर्वतयारीला वेग*

(अशोक कांबळे यांजकडून)
बारामती -  : निरंकारी संत समागम जगभरातील प्रभूप्रेमी भाविकांसाठी आनंदाची पर्वणी असते ज्यामध्ये मानवतेचा अनुपम संगम पहायला मिळतो. निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये सत्य, प्रेम व एकत्वाचा संदेश प्रसारित करत आले आहे. यामध्ये सकळजन आपली जात, धर्म, वर्ण, भाषा, वेशभूषा तसेच आहार यांसारख्या विभिन्नता विसरून  परस्पर प्रेम व एकोप्याच्या भावनेचा अंगीकार करतात.
७४व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी यावर्षी व्हर्च्युअल रूपात पूर्ण समर्पण भावनेने आणि सजगतेने करण्यात येत आहे. संत समागमामध्ये संस्कृती आणि सार्वभौमत्वाची बहुरंगी झलक यावर्षीही व्हर्च्युअल रूपात दर्शविण्यात येईल. ही पूर्वतयारी कोविड-१९च्या सरकारी निर्देशांचे पालन करत केली जात आहे. हा संत समागम २७, २८ व २९ नोव्हेंबर, २०२१ रोजी साजरा होणार असून समागमाचा मुख्य विषय ‘विश्वास, भक्ती व आनंद’ असा आहे. विश्वभरातील वक्ते, गीतकार आणि कवी सज्जन या विषयावर आपले अनुभवसंपन्न विचार, भक्तीरचना आणि कविता समागमामध्ये सादर करतील. विश्वास, भक्ती आणि आनंद हे आध्यात्मिक जागृतीचे एक असे अनुपम सूत्र आहे ज्यावर चालून आपण या परमात्म्याचा केवळ साक्षात्कारच करु शकतो असे नव्हे तर त्याच्याशी एकरूपही होऊ शकतो. समागमसंबंधी सूचना प्राप्त होताच समस्त भक्तगणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा समागम व्हर्च्युअल रूपात साजरा होत असला तरी प्रभुइच्छेला सर्वोपरी मानत त्याचा सर्वांनी आनंदाने स्वीकार केला आहे. 
संपूर्ण समागमाचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) मिशनच्या वेबसाईटवर तसेच साधना टी.व्ही चॅनलच्या माध्यमातून केले जाणार आहे. व्हर्च्युअल समागमाचे थेट प्रक्षेपण करण्याचा मिशनच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. समागमाच्या तिन्ही दिवशी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आपल्या पावन प्रवचनांद्वारे समस्त मानवमात्राला आपले पावन आशीर्वाद प्रदान करतील. 
यावर्षीचा संत समागम पूर्णपणे व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत असला तरी त्याला जीवंत रूप देण्यासाठी मिशनकडून रात्रंदिवस अथक प्रयास केले जात आहेत ज्यायोगे जेव्हा त्याचे प्रसारण होईल तेव्हा त्याची अनुभूती आणि आनंद प्रत्यक्ष समागमाप्रमाणे घेता येईल. हे सर्व सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनानेच शक्य झाले आहे.
हे सर्वविदितच आहे, की मिशनचा प्रथम निरंकारी संत समागम सन १९४८ मध्ये बाबा अवतारसिंहजी यांच्या पावन सान्निध्यात संपन्न झाला. संत निरंकारी मिशनचा प्रारंभ बाबा बूटासिंहजी यांच्या निर्देशानुसार करण्यात आला, मात्र त्याला गुरुमताचे रूप देऊन बाबा अवतारसिंहजी यांनी पुढे नेले. निरंकारी संत समागमाला व्यवस्थित, सुसज्जीत आणि प्रफुल्लीत करण्याचे श्रेय युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्याकडे जाते त्यानंतर युगदृष्टा बाबा हरदेवसिंहजी यांनी समागमाला केवळ आंतरराष्ट्रीय रूप प्रदान केले असे नव्हे तर ‘एकत्वा’वर आधारित ‘वसुधैव कुटुंबकम’, ‘विश्वबंधुत्व’ आणि ‘भिंती विरहित विश्व’ अशी ओळख्चा देऊन जगाला जात, धर्म, वर्ण, वर्ग, भाषा आणि देशाच्या विभिन्नतेच्या पलीकडे नेऊन ‘अनेकतेत एकतेचे’ दर्शन घडवले. 
वात्सल्य आणि मातृत्व यांची साक्षात मूर्ती माता सविंदर हरदेवजी यांनी एका नवयुगाचे सृजन केले आणि ‘युगनिर्माता’ रूपात प्रकट होऊन पूर्णपणे आपले कर्तव्य पार पाडले. 
वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज नव-विचार, एकाग्रता आणि सामुदायिक सामंजस्याच्या भावनेने या मिशनला पुढे घेऊन जात आहेत.
अशा तऱ्हेने ‘निरंकारी संत समागम’ ‘अनेकतेत एकतेचे’ अनुपमेय उदाहरण प्रस्तुत करत आहे.

No comments:

Post a Comment