कोहिनूर ग्रुप आणि संवाद पुणे यांचा संविधान गौरव पुरस्कार रुग्ण हक्क परिषदेला प्रदान!* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, November 27, 2021

कोहिनूर ग्रुप आणि संवाद पुणे यांचा संविधान गौरव पुरस्कार रुग्ण हक्क परिषदेला प्रदान!*

*कोहिनूर ग्रुप आणि संवाद पुणे यांचा संविधान गौरव पुरस्कार रुग्ण हक्क परिषदेला प्रदान!*

पुणे दि. २६- डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय्य -  हक्कासाठी लढणारी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 'आयएसओ' मानांकित जगातील पहिली संघटना असलेल्या रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश या संघटनेला यंदाचा दिला जाणारा प्रतिष्ठेचा संविधान गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संविधान दिनानिमित्त 'संवाद पुणे आणि कोहिनूर ग्रुप' यांच्या वतीने पुण्यातील नामांकित संस्थांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
       यावेळी युवक क्रांती दलाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, संवाद पुणेचे सुनील महाजन, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक मंचावर उपस्थित होते. रुग्ण हक्क परिषदेचे प्रतिनिधी म्हणून संघटनेचे केंद्रीय सचिव संजय जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. 
       परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्ण हक्क परिषदेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण केलेले छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटल मध्ये हजारो कोविड रुग्णांवर सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करण्यात आले. रुग्णांच्या हक्काचे संवर्धन आणि संरक्षण करणारे आदर्श हॉस्पिटलही रुग्ण हक्क परिषदेने निर्माण केले आहे. रुग्णांची लूट न करताही महागडे म्हटले जाणारे लाखो रुपयांचे उपचार देखील माफक दरात करता येतात, असे पंचतारांकित आरएचपी हॉस्पिटल पुण्यातील कोंढवा येथे निर्माण केल्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण आणि रुग्ण हक्क परिषदेचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
      संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि यशस्वी संयोजन युक्रांदचे प्रदेश कार्यवाह संदीप बर्वे यांनी केले.

No comments:

Post a Comment