22 वर्षांनी भरला दहावीचा वर्ग.!!
वार्ताहर (कैलास गायकवाड )
लोणी-धामणी:- दि.6-12-2021 लोणी (ता.आंबेगाव) येथे श्री.भैरवनाथ विद्या द्याम प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित केला होता.यावेळी ,माजी प्राचार्य स.ल. शिंदे,प्राचार्य अरुण साकोरे,गावडे सर, डुंबरे सर, द. म. शिंदे सर, चौधरी सर, गोरे सर 1998-99 च्या बॅचचे विद्यार्थी डॉ
सुधीर शिंगवेकर, डॉ. महेंद्र रोकडे, शरद बँकेचे व्यवस्थापक अनिल आदक, कंपनी व्यवस्थापक मयूर लोखंडे,सुधीर गाढवे, शिवाजी शिनलकर, नवनाथ डोके, विजय सुक्रे, माजी सैनिक सोमनाथ कदम, उद्योजक सरफराज मोमीन, हनुमंत धुमाळ, राजश्री गायकवाड, साधना वाळुंज माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती-जमती व आपल्या जीवनाचे अनुभव सांगून जुन्या गोष्टींना उजाळा देताना मात्र माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्याच्या कडा पानविल्या होत्या.यावेळी 1998-99च्या माजी विद्यार्थ्यांनी बांधकाम चालू असलेल्या इमारतीसाठी २५०००/ रुपयांची देणगी दिली.शेवटी गोड जेवणाचा अस्वाद घेऊन पुन्हा एखदा एकमेकांना भेटण्याचे पक्के ठरून निरोप घेतला.
No comments:
Post a Comment