जेजुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या अस्थीस्मारक करण्यात यावे यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्याचा ऍड.विजयगव्हाळे यांचा ईशारा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 4, 2021

जेजुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांच्या अस्थीस्मारक करण्यात यावे यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्याचा ऍड.विजयगव्हाळे यांचा ईशारा...

जेजुरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या अस्थीस्मारक करण्यात यावे यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्याचा ऍड.विजय
गव्हाळे यांचा ईशारा...
बारामती:- नुकताच बारामती येथे पत्रकार परिषद घेऊन 6 डिसेंबर पासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, जेजुरी गडाच्या पायथ्याशी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असून,त्या स्मारकापासून वंचित आहेत त्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक
कानाडोळा करताना दिसून येत आहे.ही बाब आंबेडकरी चळवळ व समाजासाठी
अत्यंत खेदाची बाब आहे.जेजुरी येथील
बाबासाहेबांच्या अस्थिंचे राष्ट्रीय स्मारक व्हावे,यासाठी स्थानिक पातळीवर
वारंवार निवेदने, आंदोलने करण्यात आली असून,देखील प्रशासनाने अजून दखल घेतलेली दिसून येत नाही परंतु आता हा लढा पुरंदर पुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रभर लढा लढला पाहिजे असे मत आंबेडकरी चळवळीतील नेते
ऍड.विजय गव्हाळे यांनी बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.जेजुरी येथे ज्या ठिकाणी अस्थि आहेत,त्याठिकाणी हळूहळू अतिक्रमणे होताना दिसून येत आहेत,परंतु अतिक्रमणावर बोलताना,गव्हाळे म्हणाले की या गोष्टीवर जास्त प्रतिक्रिया आताच देणार नाही कारण कोणत्याही दोन समाजात तेढ निर्माण न होता सामंजस्यपणाने व कायदेशीर प्रक्रियेतुन हा लढा लढण्यात येईल,हा प्रश्न सोडवताना कोणीही दोन समाजात तेढ व गालबोट लागेल अस कृत्य होणार नाही याची दक्षता देखील घेतली जाणार
असे देखील त्यांनी स्पष्ट केले.बाबासाहेबांच्या अस्थिंची अजून कुचंबणा न होता आता परिवर्तनवादी भीम सामाजिक संघटना या माध्यमातून हा प्रश्न हातात घेऊन त्याचा पहिला भाग म्हणून ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी जेजुरी येथील गडाच्या पायथ्याशी असलेल्या आंबेडकर पुतळ्यापाशी एक दिवसीय
धरणे आंदोलन करणार असून, हळूहळू हे आंदोलन अधिक व्यापक,तीव्र करणार आहोत, जोपर्यंत अस्थिचे राष्ट्रीय स्मारक होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे असे प्रतिपादन यावेळी गव्हाळे यांनी केले.यावेळी त्यांचे सोबत पंकज धिवार हे देखील उपस्थित
होते.

No comments:

Post a Comment