शासनाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा :ऍड पांडुरंग जगताप - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, December 20, 2021

शासनाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा :ऍड पांडुरंग जगताप

शासनाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा :ऍड पांडुरंग जगताप 

बारामती:-  मराठा समाजाला आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल परंतु युवकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत उद्योग व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण करावे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष ऍड पांडुरंग जगताप यांनी केले.
सोमवार दि 20 डिसेंबर रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ ची बारामती शहर,तालुका कार्यकरणी जाहीर करून त्यांना नियुक्ती ची पत्रे देण्यात आली या वेळी पांडुरंग जगताप बोलत होते 
या प्रसंगी पुणे जिल्हा  युवक अध्यक्ष प्रवीण पवार,युवती अध्यक्षा ऍड प्रियांका काटे,व तालुका अध्यक्ष संभाजी माने, तालुका अध्यक्षा ऍड सुप्रिया बर्गे, अर्चना सातव, उदयसिह बर्गे,हेमंत नवसारे,अभिजित जगताप,संदीप काकडे,आण्णा शितोळे,दीपाली नींबाळकर आदी मान्यवर उपस्तीत होते
मराठा महासंघ च्या माध्यमातून कै आण्णासाहेब  पाटील यांनी आरक्षणाची लढाई सुरू केली होती त्यास अद्याप यश आले नाही त्यामुळे युवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत छोटे मोठे  उद्योग उभा करावेत त्याच प्रमाणे वाचनालय,व्याख्याने आदी उपक्रम राबवावेत असेही जगताप यांनी सांगितले.
मराठा समाज्याच्या समस्या सोडविताना वंचित घटकांच्या सुद्धा समस्या सोडविल्या पाहिजेत असे प्रतिपादन ऍड प्रियांका काटे यांनी सांगितले.
सारथी संस्था,आण्णासाहेब महामंडळ ,डॉ पंजाबराव देशमुख वस्तूगृह आदी योजनांची माहिती घेऊन लाभ घेण्याचे आव्हान विविध मान्यवरांनी केले.
समाज्यातील आर्थिक सामाजीक शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी महासंघ च्या माध्यमातून कार्य सुरू झाल्याचे  तालुका अध्यक्ष संभाजी माने यांनी सांगितले.
या वेळी ,ज्येष्ठ,युवक,महिला,डॉक्टर, वकील,शिक्षक सेल च्या पदाधिकारी याना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती चे पत्र देण्यात आले 
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले

No comments:

Post a Comment