पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे सुद्धा रेझिंग डे होणार साजरा... बारामती:- भारत देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याहस्ते 2 जानेवारी 1962 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा प्रदान करण्यात या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हजर होते तोच महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने पोलीस रेझिंग डे सप्ताह सुरू करण्यात आलेला आहे. पोलिसांच्या कामकाजाविषयी जनतेला माहीत व्हावे .यामध्ये पोलीस दलातर्फे अवेअरनेस कॅम्प करण्यात येतो. पोलीस दलातर्फे जनता व पोलीस संवाद निर्माण व्हावा यासाठी कार्यक्रम घेतले जातात याचाच भाग म्हणून पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे सुद्धा रेझिंग डे साजरा करण्यात येत आहे. पोलीस दलामध्ये प्रत्येक जिल्हा घटकाला पोलीस बँड असतो. हा बँड पोलिसांच्या समारंभाच्या वेळी व. राष्ट्रीय सणांच्या वेळी त्याच्यातर्फे धून वाजवण्यात येते. अशा या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या बँड चे प्रात्यक्षिक व प्ले उद्या शारदा प्रांगण समोर तीन हत्ती चौक या ठिकाणी सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास सामाजिक अंतर ठेवून तोंडाला मास्क लावून सैनीटायझर चा वापर करून उपस्थित रहावे. व पोलीस बँड चा सुरेल तलातून निर्माण होणाऱ्या संगीताचा आस्वाद घ्यावा हि पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे विनंती आहे.
Post Top Ad
Wednesday, January 5, 2022
पुणे ग्रामीण पोलीस दलातर्फे सुद्धा रेझिंग डे होणार साजरा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment