बारामती शहर पोलिसांची विना मास्क फिरणार्यावर वर कारवाई, थुंकताना सापडल्यास देखील होणार कारवाई... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 5, 2022

बारामती शहर पोलिसांची विना मास्क फिरणार्यावर वर कारवाई, थुंकताना सापडल्यास देखील होणार कारवाई...

बारामती शहर पोलिसांची विना मास्क फिरणार्यावर वर कारवाई, थुंकताना सापडल्यास देखील होणार कारवाई...                                                                        बारामती:- ओमायक्रोन कोरोना स्ट्रेन च्या बातम्या डिसेंबर महिन्यात यायला सुरू झाल्या होत्या. तेव्हापासून बारामती शहर पोलीस ठाण्यात नाकाबंदी व फिरून विना मास्क कारवाई सुरू होती. डिसेंबर महिन्यामध्ये एकूण 85 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी काल याबाबत स्वतंत्र गर्दीवर निर्बंध घालणारे आदेश निर्गमित केले आहेत. त्या आदेशान्वये बारामती शहर पोलिसांनी आज शहरांमध्ये विना मास्क कारवाई इंदापूर चौक भिगवन चौक या ठिकाणी करून आजच्या दिवशी एकूण 30 लोकांच्यावर कारवाई करून पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना या ठिकाणी सूचना आहे की आपण विना मास्क बाहेर पडू नये. शासनाने घालून दिलेल्या लग्न समारंभ व कार्यक्रमाच्या बाबतीत गरजेची संख्या ओलांडू नये. ही विनंती. याठिकाणी नवीन जिल्हाधिकारी यांच्या देशामध्ये जर कोणी थुंकी करताना   निदर्शनास आल्यास हजार रुपये दंडाची पावती करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की. आपणाकडे कुणी थुंकताना व्हिडीओ मिळाल्यास तो आम्हाला पाठवावा. आपले नाव गुपित ठेवण्यात येईल व व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाई करण्यात येईल.

No comments:

Post a Comment