राज्यात 10 मार्च नंतर भाजप सरकार येणार:प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 9, 2022

राज्यात 10 मार्च नंतर भाजप सरकार येणार:प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील.

राज्यात 10 मार्च नंतर भाजप सरकार येणार:प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील.

पुणे:-महाराष्ट्रात सद्या आरोप प्रतिआरोपाचे वातावरण तापले आहे यामध्ये नुकताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सक्तवसुली संचलनालयाचा वापरही केला जात असल्याचा आरोप केला.राऊतांच्या आरोपानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.राज्यात 10 मार्चनंतर सत्ताबदल होईल. तेव्हा 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असे विधान पाटील
यांनी केले आहे,भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे येथे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने
भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचा त्रास तळागाळातील कार्यकर्त्याना होतो. त्यांनी त्यांची काळजी माझ्याकडे व्यक्त केली. तेव्हा 10 मार्चला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर आपले सरकार येईल, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकत्त्यांचे मन राखण्यासाठी तसे बोलावे लागत असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे भाजप नेते वारंवार बोलत असतात. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे
यांनीही महाराष्ट्रातील मविआ सरकार मार्च महिन्यात कोसळणार असा दावा केला होता. त्यांच्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगताना राज्यात 10 मार्चनंतर भाजपच सरकार येणार, असे महत्वाचे विधान केले आहे.

No comments:

Post a Comment