लीला पुनावाला फौंडेशन पुणे यांजकडून विविध शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 10, 2022

लीला पुनावाला फौंडेशन पुणे यांजकडून विविध शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप..

लीला पुनावाला फौंडेशन पुणे यांजकडून विविध शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप                                                                                         लोणी-धामणी : प्रतिनिधी(प्रा.अरुण गोरडे).दि :१०/०२/२०२२.:- गावडेवाडी (ता.आंबेगाव)  आदर्श गाव |गावडेवाडी येथील हिरकणी विद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी फौंडेशनचे विश्वस्त फिरोज पुनावाला ,संस्था सचिव प्रवीण गावडे,संचालक विजय गावडे,आयबीटी कमिटीचे अध्यक्ष  अनिल गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष देवराम गावडे ,अशोक डोंगरे ,डॉ कोळी, राष्ट्रसह्यादी चे उपसंपादक मनोज तळेकर समस्त ग्रामस्थ व  पालक  उपस्तीत होते 
  या कार्यक्रमात 34 मुलींना सायकल वाटप,टॅब,गणवेश, स्कूल बॅग,शूज,जर्नल  यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी फिरोज पुनावाला यांनी मुली व पालकांशी संवाद साधला म्हणाले की दोन वर्षांच्या कालावधीत मुलांचे खूप शैक्षणिक नुकसान झाले.त्यामुळे पालकांनी अधिक काळजी घेऊन मुलींना मदत करावी मुलींना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभी करावा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल असेल शिक्षण घ्यावे यासाठी पालकांनी सहकार्य करावे आम्ही सर्व प्रकारची मदत देऊ अर्ध्यातच लग्न करू नका किंवा शिक्षण सोडू नका ,मुलींनी देखील उत्तम अभ्यास करा सर्व प्रकारच्या फौंडेशनच्या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात रोजगार गेला कौटुंबिक समस्या निर्माण झाली तरी आमच्याकडून आपणास दोन वेळा धान्य वाटप करण्यात आले. मुलींना कोरोना प्रतिबंध साठी सॅनिटाइझर वाटप करण्यात आले ,
सध्या एस.टी चा संप सुरू आहे. मुलींना शाळेत येण्याजाण्याची समस्या आली काही मुली दोन अडीच ते पाय कीलो मीटर वरून शाळेत येतात त्यांना सोयीचे व्हावे म्हणून सायकल वाटप करण्यात आले अजूनही सर्व प्रकारची मदत केली जाईल. 
   या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद बोंबले यांनी मागील दहा  वर्षात फौंडेशन च्या माध्यमातुन झालेल्या मदतीबद्दल सांगितले की स्वच्छता गृह इमारत बांधकाम, रंगकाम,  सौर ऊर्जा संच, बेंच, स्मार्ट 65 इंच टीव्ही, संच पेव्हर ब्लॉक कंपाउंड, प्रयोगशाळा साहित्य व मुलींना अनेक प्रकारच्या मदत दिली .उत्कृस्ट गुणवत्ता धारक विद्यार्थी नीना टॅब चे वाटप केले. 
कार्यक्रम चे आभार तंटा मुक्तीचे अध्यक्ष देवराम गावडे यांनी मानले कार्यक्रमचे सूत्र संचालन दहितुले मॅडम यांनी केले व कार्यक्रम व्यवस्था हुले सर रासकर सर,कदम मॅडम, राजगुरु सर,गावडे सर व सेवक वृंद यांनी पाहिले.

No comments:

Post a Comment