मानाच्या वादात, कोयत्याने वार तेही पिस्तुलाचा धाक दाखवून, 5 जण अटक... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

मानाच्या वादात, कोयत्याने वार तेही पिस्तुलाचा धाक दाखवून, 5 जण अटक...

मानाच्या वादात, कोयत्याने वार तेही पिस्तुलाचा धाक दाखवून, 5 जण अटक...                                                                         यवत:- गावातला वाद कुठल्या टोकाला जाईल हे सांगू शकत नाही याचे उदाहरण यवत गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ देवस्थान पालखीचा मानकरीचा मागील अनेक वर्षापासून वाद आहे.याच वादातून 6 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास किरण गायकवाड यांच्यावर पाच जणांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी पिस्तुलाचा  धाक दाखवून गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले होते. हा प्रकार यवत स्टेशन रोडवर घडला होता. या गुन्ह्यातील 5 फरार आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या अटक केली आहे.सागर माधवराव दोरगे  (वय-29 रा. यवत पाटील वस्ती, यवत स्टेशन पुणे), अक्षय ईश्वर यादव (वय-27 रा. यादववाडी यवत), अभिषेक संतोष दोरगे (वय-24 रा. पिंपळाची वाडी, यवत), हर्षल बाळु जगताप (वय-22 रा. कासुर्डी कामतवाडी यवत), विजय अनिल टेमगिरे (वय-25 रा. भरतगाव यवत) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई बुधवारी (दि.23) लोहियानगर येथे करण्यात आली.यवत गावच्या भैरवनाथ देवस्थान पालखीचे मानकरी वरुन किरण गायकवाड आणि सागर दोरगे यांच्यामध्ये मागील बऱ्याच वर्षापासून वाद आहे. याच वादातून 6 फेब्रुवारी रोजी किरण गायकवाड हे त्यांच्या मित्रासोबत जेजुरी येथून देवदर्शन करुन येत असताना आरोपींनी कारमधून येऊन फिर्यादी गायकवाड यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.याबाबत गायकवाड यांनी ग्रामीण पोलिसांच्या यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक बुधवारी हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी कारमधून (एमएच 10 एएन
0900) बाबुमामडा चौक लोहियानगर येथे
मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती
मिळाली. पोलिसांनी लोहियानगर येथे सापळा
रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे
चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली
दिली. पुढील कारवाईसाठी आरोपींना यवत
पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सह पोलीसआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, राहुल मखरे, दत्ता सोनावणे, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment