'निरंकारी' नी साफसफाई करून केला 'स्मृती दिन' साजरा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

'निरंकारी' नी साफसफाई करून केला 'स्मृती दिन' साजरा*

*'निरंकारी' नी साफसफाई करून केला 'स्मृती दिन' साजरा* 

बारामती प्रतिनिधी:- संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या बारामती शाखेच्या वतीने बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनी (२३ फेब्रुवारी) रोजी सकाळी संत निरंकारी सत्संग भवनचे प्रांगण व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून अनोख्या पद्धतीने स्मृती दिन साजरा केला. यात निरंकारी सेवादलचे १५० हुन अधिक महिला व पुरुष सदस्य सहभागी झाले होते. 
    बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिनी देशात १६ राज्यात ६१ निरंकारी सत्संग भवनमध्ये मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शिबीरांचे तसेच 'सफाई अभियान ' व वृक्षारोपणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.
    निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या सानिध्यात निरंकारी मिशन ने अध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून प्रेम, दया, करुणा, एकत्व यासारख्या उदात्त भावनांशी जोडून 'भिंती विरहित' जगाची परिकल्पना साकार केली. त्यांनी आपल्या भक्तांना अध्यात्मिकते बरोबरच मानवता व प्रकृतीची सेवा करत आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची प्रेरणा दिली. वर्तमान काळात हीच शृंखला सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज सातत्याने पुढे घेऊन जात आहेत. संत निरंकारी मिशन मानव कल्याणाच्या कार्यामध्ये सदोदित अग्रेसर राहिले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण व सशक्तीकरण या क्षेत्रामध्ये सेवाकामे करीत असून हे कार्य निरंतर पुढे पुढे जात आहे.

No comments:

Post a Comment