*प्रधानमंत्रीजी, आपसे नाराज नहीं, हैराण हूँ मै* *महाराष्ट्राचा 'सुपरस्प्रेडर' म्हणून केलेला उल्लेख दुर्दैवी, सुप्रियाताई सुळे यांची प्रधानमंत्र्यांच्या भाषणावर सडकून टिका* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 8, 2022

*प्रधानमंत्रीजी, आपसे नाराज नहीं, हैराण हूँ मै* *महाराष्ट्राचा 'सुपरस्प्रेडर' म्हणून केलेला उल्लेख दुर्दैवी, सुप्रियाताई सुळे यांची प्रधानमंत्र्यांच्या भाषणावर सडकून टिका*

*प्रधानमंत्रीजी, आपसे नाराज नहीं, हैराण हूँ मै*

*महाराष्ट्राचा 'सुपरस्प्रेडर' म्हणून केलेला उल्लेख दुर्दैवी, सुप्रियाताई सुळे यांची प्रधानमंत्र्यांच्या भाषणावर सडकून टिका*

नवी दिल्ली :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचा 'सुपरस्प्रेडर' असा केला उल्लेख धक्कादायक असून त्यांच्याकडून या विधानाची अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राची लेक आणि महाराष्ट्राची खासदार म्हणून आपल्याला प्रश्न विचारतेय की, आपण महाराष्ट्राबद्दल गैरसमज पसरवणारं वक्तव्य का केलं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे. 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान सोमवारी संसदेत महाराष्ट्रामुळे कोरोनाचा प्रसार झाला असा उल्लेख केला होता. या उल्लेखानंतर त्यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी प्रधानमंत्र्यांना उददेशून "कोरोनाच्या काळात लोकांनी एकमेकांना मदत केली. माणूसकीचे दर्शन घडविले.   'प्रधानमंत्रीजी, आप से नाराज नहीं हूँ, हैराण हूँ मै आपसे', असा उल्लेख केला.  त्या म्हणाल्या की, "तुम्ही आज माझ्या महाराष्ट्राबद्दल आम्ही सुपस्प्रेडर आहोत असं विधान का केलं. महाराष्ट्राची लेक म्हणून मी आज तुमच्याकडे न्याय मागत आहे.  
महाराष्ट्रातील जनतेने भाजपाचे १८ खासदार निवडून देऊन नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. मोदींनी महाराष्ट्रावर अशा प्रकारे केलेले आरोप हे दुर्दैवी असून त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा हा अपमान आहे अशी टिकाही त्यांनी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "देशातील वाढली महागाई, बेरोजगारी, कोरोना या स्थितीबाबत एक 'स्टेटसमन' म्हणून प्रधानमंत्री काहीतरी आश्वासकपणे बोलतील, त्यांच्या भाषणातून देशाला दिशा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती.पण ते भाषणादरम्यान ते आपल्या महाराष्ट्राबद्दल  जे बोलले ते खुप दुःखद आहे. ज्या राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले.त्यांना प्रधानमंत्री करण्यात महाराष्ट्राच्याही मतदारांचाही मोलाचा हात आहे.त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान त्यांनी कोविड सुपरस्प्रेडर म्हणून केला. हे धक्कादायक आहे."
एकदा निवडून आले की ते देशाचे प्रधानमंत्री असतात. हे पद या देशातील सर्वात महत्वाचे आहे. पण ते एका राज्याच्या वतीने बोलत होते. हे दुर्दैवी आहे अशी टिपण्णी करुन सुप्रियाताईंनी कोरोना काळातील श्रमिक ट्रेन्सची आकडेवारीच सादर केली. याशिवाय तत्कालिन रेल्वेमंत्री पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीटस्, विधाने आणि पत्रव्यवहार यांचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले. त्या  म्हणाल्या की " महाराष्ट्र सरकार फारतर एसटी बस किंवा खासगी वाहन सुविधा उपलब्ध करुन देऊ शकते. रेल्वेची सुविधा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. कोरोना काळात गुजराजमधून १०३३ तर महाराष्ट्रातून ८१७ श्रमिक ट्रेन्स सुरु करण्यात आल्या होत्या. रेल्वे केंद्र सरकार चालविते, महाराष्ट्र नाही, त्यामुळे जेंव्हा प्रधानमंत्री सांगतात की महाराष्ट्राने कोविड पसरविला तेंव्हा मला याची आठवण करुन द्यावी लागेल की आम्ही रेल्वे देऊ शकत नाही,"
त्या पुढे म्हणाल्या की, " माननीय पियुषजी गोयल हे रेल्वेमंत्री असताना त्यांनी २४ मे रोजी पाच ट्वीट केले आहेत. त्यामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उद्देशून म्हणत आहेत की आम्ही १२५ श्रमिक ट्रेन्स पाठवित आहोत. यासंदर्भात त्यांनी पत्र देखील लिहिले आहे.हा पुरावा आहे. मी हे बोलतेय कारण प्रधानमंत्री महाराष्ट्राला लक्ष्य करुन बोलत आहेत. हे वेदनादायी आहे. देवेंद्रजींनी देखील श्रमिक ट्रेन्सबाबत पियुष गोयल यांचे आभार मानले आहे. हा सर्व संवाद सोशल मिडियावर उपलब्ध असून महाराष्ट्राबाबत सातत्याने गैरसमज पसरविण्यात येत आहे." 
कोरोनाच्या काळात देशभरातील संसद सदस्यांनी माणूसकीचे दर्शन घडविले. एकमेकांना मदत केली. याचा उल्लेख करुन सुप्रियाताई म्हणाल्या की, "आम्ही खासदारांनी एकमेकांच्या राज्यात अडकलेल्या लोकांची सोय केली. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली. यासाठी आम्ही एकमेकांचे जाहिर आभार मानले आहेत. अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करणे या देशाची संस्कृती आहे. आपण आता राजकारणासाठी माणुसकी पण विसरणार आहोत का?" 
 सातत्याने महाराष्ट्रावर टिका केली जाते. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी काम केलं जातं. महाराष्ट्राचे प्रकल्प बाहेर दिले जातात. पण एक सांगू इच्छिते की, महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकलेला नाही आणि झुकणारही नाही. असेही त्या यावेळी म्हणाल्या.   

चौकट १
जेंव्हा देशात कोरोनाचा प्रसार होत होता तेंव्हा हे लोक मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात व्यस्त होते असा आरोप सुप्रियाताईंनी केला. त्या म्हणाल्या की,  "कोरोनाचा प्रसार होण्यापुर्वीचे जे संसदेचे अधिवेशन सुरु होते त्या अधिवेशनात तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय हे यांनी सभागृहात प्रधानमंत्र्यांकडे पायी चालत जाऊन प्रत्यक्ष विनंती केली होती की कृपया अधिवेशन आता थांबवू. खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ द्या. पण त्यांनी त्यावेळी ते ऐकले नाही. कारण ते मध्यप्रदेशातील सरकार पाडण्यात व्यस्त होते."   

हा राज्याच्या अस्मितेचा विषय असून भाजपातील आमदार-खासदारांनीही याचा जाब विचारावा असे आहान करुन त्या म्हणाल्या की "पंजाब आणि उत्तर प्रदेशासोबत आपले किती जुने संबंध आहेत हे सर्वांना माहित आहे. पण प्रधानमंत्र्यांसारखी जबाबदार व्यक्ती आपल्या भाषणातून आपल्यांत वितुष्ट आणू पाहते हे दुर्दैवी आहे."

No comments:

Post a Comment