जमिनीच्या वादातून आई व मुलीला मारहाण..
लोणी धामणी प्रतिनिधी -(कैलास गायकवाड):-
वाळुंज नगर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. येथील जुन्या जमिनीच्या वादातून ट्रॅक्टर घेऊन शेतात येऊ नका, असे म्हटल्याने, आई व तिच्या मुलीला मारहाण करण्यात आली ही घटना दि ५-२-२०२२ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. आशा दत्तात्रेय रणपिसे वय वर्ष ४२ राहणार वाळुंजनगर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. यांनी याबाबत फिर्याद मंचर पोलीस ठाणे येथे दिली.
फिर्यादी आशा रणपिसे जमीन गट नंबर २६३ यावरून जुना वाद आहे. पाच तारखेला, दुपारी एक वाजता वाळुंज नगर येथे, अप्पा नामदेव वाळुंज व सारिका अप्पा वाळुंज हे जमिनीत ट्रॅक्टर घेऊन आले असता, फिर्यादी आशा रणपिसे यांनी आमच्या शेतात ट्रॅक्टर घालू नका असे बोलल्या वरून, आप्पा वाळुंज व सारिका वाळुंज या दोघांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथा बुक्यानी मारहाण केली तसेच तसेच फिर्यादीच्याआईला ढकलून दिले
खाली पडल्याने तिच्या डोक्याला कानापाशी दगड लागून दुखापत झाली. असल्याचे फिर्यादी ने सांगितले वरील दोघांविरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
No comments:
Post a Comment