बारामती तालुक्यात दिवसाढवळ्या दरोडा,अंदाजे ३० तोळ्याचे सोन्याचे दागिन्यांवर डल्ला.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 5, 2022

बारामती तालुक्यात दिवसाढवळ्या दरोडा,अंदाजे ३० तोळ्याचे सोन्याचे दागिन्यांवर डल्ला.!

बारामती तालुक्यात दिवसाढवळ्या दरोडा,अंदाजे ३० तोळ्याचे सोन्याचे दागिन्यांवर डल्ला.!
बारामती:-  बारामती तालुक्यातील कऱ्हावागज या गावात चक्क दिवसाढवळ्या घराची कुलूपं तोडून अज्ञात चोरट्यांनी २८ ते ३० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.दि.५/२/२०२२  रोजी शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजल्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केल्याचं कळतंय.
कऱ्हावागज या गावातील बनकर कुटुंबातील मच्छिंद्र बनकर आणि गोरख बनकर हे सख्खे भाऊ शेजारी शेजारी राहतात. घरातील सर्व
लोक शेतात हरभरा तूर खुरपण्यासाठी  गेली होती.मच्छिंद्र बनकर घरी होते मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेळ्यांना चारा आणण्यासाठी ते देखील रानात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील १५ तोळ्या पेक्षा जास्त दागिने चोरून घरासमोरच राहणारे त्यांचे भाऊ गोरख बनकर यांच्या देखील घराचे कुलूप कटावणीने उचकटून तीन गंठण,अंगठ्या, राणीहार, सोनसाखळ्या असा जवळपास १८ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. गोरख आणि मच्छिंद्र बनकर यांचे दोघांचे मिळून जवळपास २८ ते ३० तोळे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी चोरून नेले असल्याचे कळतंय, दोघेही बंधू टेलिफोन खात्यातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मिळालेल्या पैशातून त्यांनी सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. हे दागिने बनकर कुटुंबाने घरातल्या लग्नकार्यासाठी तयार केले होते.बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या सहाय्याने पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.या नवीन घटनेने पुन्हा बारामती तालुका पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले तर नुकताच शिसुफळ येथील मंदिरातील चोरीचा तपास केला होता.

No comments:

Post a Comment