बारामतीत जळालेल्या अवस्थेत आढळला पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

बारामतीत जळालेल्या अवस्थेत आढळला पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह..

बारामतीत जळालेल्या अवस्थेत आढळला पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह..                          बारामती:- आज सकाळी आठ साडे आठ वाजण्याच्या सुमारास जळोची स्मशान भूमी च्या पाठीमागे एक जळालेल्या अवस्थेमध्ये पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह मिळालेला आहे, इसमाची ओळख पटलेली असून त्याचे नाव अभिजीत विजय खरात वय 35 वर्ष राहणार अंथूर्णे  तालुका इंदापूर व सध्या  श्रीराम नगर बारामती येथे राहत होता,सदरचा इसम हा औषधाच्या दुकानात कामाला होता केलेल्या चौकशी वरून व घटनास्थळावरील परिस्थितीवरून सदर इसमाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेऊन रात्री उशिरा स्मशान भूमी च्या पाठीमागे आत्महत्या केलेली प्रथमदर्शनी दिसून येत आहे,प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे करत आहेत. घटनास्थळावर विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिली.

No comments:

Post a Comment