भानुदास शिंदे यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

भानुदास शिंदे यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान

भानुदास शिंदे यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान
     
मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन पुरस्कृत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय पुरस्कार सोहळा सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. विविध क्षेत्रात कार्यरत ४० कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 40 नारिशक्ती पुरस्कारासोबतच ६ गुणवंताना राष्ट्रस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार आणि १० गुणिजनांना राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या गुणिजन मानकऱ्यांमध्ये सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेवून शिक्षण क्षेत्रातील महत्वाचा मानला जाणारा शिक्षण रत्न हा पुरस्कार वामनराव मुरांजन कनिष्ठ महाविद्यालय मुलुंड व माझगाव नाईट हायस्कूल मुलुंड येथील तंत्रस्नेही शिक्षक भानुदास शिंदे यांना मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, राष्ट्रीय कीर्तनकार- कवी - विचारवंत - व्याख्याते ह. भ. प. श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड, इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जे. सानिपीना राव हे मान्यवर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह. भ. प. आळंदीकर महाराज यांनी केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतांनी भारतीय संविधानाला अपेक्षित अशी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हि मूल्ये समाजात खोलवर रुजविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले.विविध क्षेत्रांमधून भानुदास शिंदे यांचे कौतुक होत आहे.समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध समुपदेशिका व समाजसेविका मिनाक्षी गवळी आणि सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या शिक्षणतज्ज्ञ मनिषा कदम यांनी केले. सेवाभावी उद्योजिका सविता जाधव यांनी मानकऱ्यांच्या सन्मानार्थ सर्व मानकऱ्यांचे पारंपरिक औक्षण तसेच चहापान समारंभ आयोजित करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. समारंभ अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड यांनी उपस्थितांना ग्लोबल गुणिजन शपथ प्रदान केली आणि गुणिजन संसदेत पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षण रत्न पुरस्कार पात्र ठरलेले गुणिजन मानकरी भानुदास शिंदे यांचे उपस्थित पाहुण्यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. "पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!" या ब्रीदवाक्यावर कृष्णाजी जगदाळे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

No comments:

Post a Comment