अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वर्तीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान..
*बारामती शहराध्यक्ष म्हणून महेश गायकवाड यांची नियुक्ती*
बारामती:-काल बारामती क्लब येथे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चर्चासत्र व पदाधिकारी
निवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी नूतन
पदाधिकार्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा लक्ष्मण हाके व अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष किशोर मासाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना किशोर मासाळ यांनी सांगितले की ओबीसींचे आरक्षण आज धोक्यात असताना समाजातील युवक-युवतींनी विद्यार्थ्यांनी सक्षमपणे आरक्षणाचा लढा लढला पाहिजे यासाठी जातीपातीचे राजकारण न करता आपण सर्वांनी ओबीसी म्हणून एकत्र आले पाहिजे असे सांगितले. यावेळी आयोगाचे सदस्य
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाचे फायदे सांगत आरक्षणासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगत एम्पिरिकल
डाटा तयार करण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूणे जिल्हा अध्यक्ष व बारामतीचे माजी नगरसेवक अभिजित काळे यांनी केले व स्वागत भारत भोंग व ज्ञानदेव खामगळ यांनी केले आभार सचिन शाहीर यांनी
मानले.प्रमुख उपस्थिती म्हणुन राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा लक्ष्मणराव हाके, युवक प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ,प्रदेश कार्याध्यक्ष सचिन शाहीर, अध्यक्ष तात्यासाहेब देढे, सचिव भारत भोंग, जिल्हाध्यक्ष अभिजीत काळे, ओबीसी नेते देवा बनकर, मा रामभाऊ घोळवे, कोहळे ग्रा पं सदस्य सुरज खोमणे, रोहीत बनकर, प्राजक्ता रासकर धनंजय जमदाडे,नवनाथ मलगुंडे , नितीन मासाळ , दादा टेंगले, सारिका आटोळे,श्रीकांत पवार उपस्थित होते. यावेळी संघटनेचे प्रमुख 50 नविन पदाधिकार्याच्या नियुक्तीपत्र देण्यात आली.यावेळी बारामती शहर अध्यक्ष पदी महेश गायकवाड , सौ निता फरांदे यांची सातारा जिल्हा निरिक्षक, सातारा जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून नुरजहाँ सय्यद, पुणे महिला जिल्हाध्यक्ष ज्योती कुटे बारामती ,शहर अध्यक्ष सोनल नागरगोजे, बारामती तालुका अध्यक्ष नाना मदने, बारामती तालुका महिला अध्यक्ष उज्वला खोमणे ,बारामती शहर उपाध्यक्ष दादासाहेब दांगडे यांची नियुक्ती करण्यात आली.
No comments:
Post a Comment