अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाचा विश्वासघात : बापुराव सोलनकर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाचा विश्वासघात : बापुराव सोलनकर

अर्थसंकल्पामध्ये धनगर समाजाचा विश्वासघात : बापुराव सोलनकर

बारामती:- महाराष्ट्र सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला.यामधे धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भांमध्ये महाविकास सरकारकडून धनगर समाजाला काहीच मिळाले नाही, यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी- मेंढी महामंडळ, तसेच मेंढपाळांना मिळणाऱ्या योजना, यामध्ये काहीच तरतूद करण्यात आली नाही, महाराजा यशवंतराव होळकर यांचे वाफगाव येथील स्मारक व्हावे ही मागणी अनेक वर्षापासूनची मागणी आहे परंतु या अर्थसंकल्पामध्ये अनेक गड, किल्ल्यांना, स्मारकांना अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली परंतु ज्यांनी अखंड हिंदुस्थानांतून आपल्या कर्तृत्वाने  इंग्रजांना पळवून लावले  अशा महापराक्रमी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या वाफगाव ता.खेड येथील जन्मस्थान असलेला स्मारकाला निधीची तरतूद न करणे म्हणजे जातीवादी मानसिकतेतून घेतलेला निर्णय आहे.धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न तसेच ओबीसीचे राजकीय आरक्षण घालवले, त्यामुळे बहुजन समाजाकडे बघण्याचा महाविकास आघाडी सरकारचा  जातीवादी दृष्टिकोन आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदान करताना विचार करा असे यशवंत ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर यांनी म्हटले आहे.

  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जातीवादी मानसिकतेचे आहेत त्यांच्याकडून धनगर समाजाला कधीच न्याय मिळणार नाही,  असे यशवंत ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोलनकर यांनी अर्थसंकल्पावरून महाविकास सरकारवर टीका केली आहे.

No comments:

Post a Comment