यंदा शिवजयंती होणार भव्य दिव्य स्वरूपात साजरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

यंदा शिवजयंती होणार भव्य दिव्य स्वरूपात साजरा..

यंदा शिवजयंती होणार भव्य दिव्य स्वरूपात साजरा..
बारामती:- शहरात सालाबाद प्रमाणे शिवजयंती सोमवार 21 मार्च 2022 रोजी भव्य प्रमाणात साजरी होणार आहे .दोन वर्ष कोरोना काळामुळे कोणताही उत्सव साजरा करता आला नाही त्यामुळे शिवप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे 21 मार्च रोजी दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केले असुन सायंकाळी 5 वाजता छत्रपति शिवाजी महाराज उद्यान कसबा येथून भव्य मिरवणूक निघणार असुन त्यामध्ये उंट, घोडे, ढोल पथक ,पारंपरिक न्रुत्य ,लाठी काठी ,मर्दानी खेळ इत्यादी पथकं सहभागी होणार असुन शिवप्रेमी नागरिकांनी हजारो च्या सख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती तर्फे करण्यात येत असल्याचे अध्यक्ष -सुनिल(आण्णा ) शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment