87 महिलांनी घेतल्या स्किन व हेअर केअरच्या टिप्स....
बारामती प्रतिनिधी:- योद्धा महिला मंच व ट्युलिप ब्युटी अकॅडमी यांच्या वतीने त्वचा व केसांची निगा कशी राखावी याविषयी मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले होते. वाढत्या उन्हाचा प्रकोप लक्षात घेता उन्हापासुन स्किन संरक्षण याविषयी शुभांगी जामदार यांनी तर घामामुळे होणारे केसांचे नुकसान याविषयी महेश औचरे यांनी मार्गदर्शन केले.
उन्हाळ्यात आपली त्वचा व केस कसे चांगले ठेवावे याच्या टिप्स महिलांना मिळाल्यामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले.
परिसरातील 87 महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या सेमिनार मध्ये बारामती तालुक्यासह दौंड, इंदापूर, माळशिरस, अकलूज, या परिसरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. जानाई टेक्सटाईल यांच्यातर्फे प्रत्येक सहभागी महिलेस गृहपयोगी वस्तु भेट देण्यात आली.
या कार्यक्रमात निर्भया पथकाच्या अमृता भोईटे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला. निर्भया पथक कशाप्रकारे काम करते, निर्भया पथकाची गरज आणि महत्त्व याविषयी अमृता भोईटे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धनश्री भरते, स्वप्निता खामकर, विश्वा शाळू,अक्षदा लोणकर तसेच नानासाहेब साळवे, योगेश नालंदे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment