क्षेत्र भीमाशंकर येथे दिनांक २१ एप्रिल ते २४एप्रिल दरम्यान रुद्र स्वाहाकार, सतत जलधारा व अखंड हरिनाम सप्ताह..
आंबेगाव तालुका प्रतिनिधी :-ता.२०/४/२०२२ भिमाशंकर तालुका आंबेगाव बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला भीमाशंकर येथे संपूर्ण विश्वात शांतता व सुख- समृद्धी, शांती निर्माण व्हावी, या उद्देशाने दि.२१ते २४ दरम्यान श्री भीमाशंकर ग्रामस्थ रुद्र स्वाहाकार समितीतर्फे सतत जलधारा, रुद्रभिषेक, रुद्र स्वाहाकार व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. असे श्री भीमाशंकर रुद्र स्वाहाकार ग्रामस्थ समितीचे अध्यक्ष मधुकर गवांदे त्यांनी सांगितले.
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे १९७९ पासून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.दि.२१ गुरुवारपासून ते दि.२४रविवार पर्यंत, महारुद्र, जलधारा अभिषेक, रुद्र स्वाहाकार, रुद्राभिषेक व अखंड हरिनाम सप्ताह चे नियोजन केले आहे.२०२०ते २०२१ या दोन वर्षाचा कालखंडामध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे रुद्र सहकार कार्यक्रम झाला नव्हता, यावेळी सर्व शासकीय नियमांचे पालन करून, सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, असे श्री भीमाशंकर ग्रामस्थ स्वाहाकार समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत कौदरे, व सचिव रत्नाकर कोडीलकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment