बारामती शहर पोलिसांच्या गावठी हातभट्टी वर धाडी,मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष.?
बारामती:- बारामती व बारामती तालुक्यातील अनेक भागात अवैध दारू विक्री होत असल्याचे बातम्या प्रसिद्ध होत असताना शहर पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी गावठी हातभट्टी दारू वर कारवाई करण्याचे पोलिसांना सक्त आदेश दिले आहेत. त्या आदेशाप्रमाणे बारामती शहर पोलिसांनी मॅक डोनाल्ड कंपनी च्या पाठीमागे नीरा कॅनल जवळ चालू असलेली पिंपळी गावच्या हात भट्टी वर रेड करून त्या ठिकाणी आठ दोनशे लिटर चे बेरेल रसायन नाश करून तोडून टाकलेली आहे व सदर ठिकाणी दारू गळणारी महिला अलका शशिकांत उर्फ सेशाल्या पवार राहणार इंदिरानगर झोपडपट्टी कंपनी शेजारी पिंपळी याच्यावर भादवि कलम 328 व दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे कारवाई करून 16 हजार रुपयांचा मुद्देमाल नाश केलेला आहे तसेच गुणवडी गावच्या हद्दीत बांदलवाडी या ठिकाणी मंगल गणेश गंगावणे या महिलेच्या दारू भट्टीवर रेड करून त्या ठिकाणावरून 30 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून चारशे लिटर रसायनाचे दोन बॅरल फोडण्यात आले त्या ठिकाणी एकूण सात हजार एकशे वीस रुपयांचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिच्यावर ही वरील प्रमाणेच कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाया पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घोडके, निंबाळकर तसेच तपासी पथकाचे कल्याण खांडेकर दशरथ कोळेकर सहाय्यक पोलीस फौजदार काळे यांनी केलेले आहेत
No comments:
Post a Comment