खळबळजनक..मेडिकल कॉलेज मध्ये कामाला लावतो म्हणून महिलेचा विनयभंग केल्याने वरिष्ठ सहाय्यकाला केली अटक..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 24, 2022

खळबळजनक..मेडिकल कॉलेज मध्ये कामाला लावतो म्हणून महिलेचा विनयभंग केल्याने वरिष्ठ सहाय्यकाला केली अटक..!

खळबळजनक..मेडिकल कॉलेज मध्ये कामाला लावतो म्हणून महिलेचा विनयभंग केल्याने वरिष्ठ सहाय्यकाला केली अटक..!     बारामती:- बारामती मध्ये खळबळजनक घटना घडली असल्याचे दाखल झालेल्या फिर्यादीवरून दिसून येत आहे, अश्या अनेक घटना घडतात कामाला लावण्याच्या आमिषाने किती महिलांना फसविले जाते, आपल्या जाळ्यात ओढले जाते तर कित्येकांचे संसार धुळीस मिळविले असेल याची कल्पना केली तर चीड निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, अशीच एक धक्कादायक घटना घडली, बारामती मधील नामांकित मेडिकल कॉलेज मध्ये कामाला लावतो म्हणून वरिष्ठ सहाय्यकाने केलेल्या प्रकारामुळे विनयभंगाची तक्रार दाखल झाली याबाबत सविस्तर असे की, बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये हजर राहून फिर्यादीनी(पीडित महिला) जबाब लिहून दिला की मी व  माझे पती यांचेसह राहण्यास असून माझे पती यांचे दुकान असून त्यावर आमच्या कुटुंबाचा उदार निर्वाह चालतो,मेडीकल कॉलेजमध्ये असणारे वरिष्ठ सहाय्यक दादासो दशरथ काळे यांचेकडे त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला होता.त्याअनुषगाने माझी व माझ्या जावेची चर्चा झालेने मी पण नोकरीसाठी अर्ज केला. मी गेले 2 दिवसापूर्वी मेड़ीकल कॉलेज तांदूळवाडी ता बारामती जि
मध्ये नोकरीस असलेले दादासो दशरथ काळे यांनी मला प्रथम नोकरीच्या अनुषगाने त्याचे मोबाईलवरून माझा कडे असणाऱ्या मोबाईल वर  वेळोवेळी फोन करून नोकरीच्या निमित्ताने माझ्याशी वेळोवेळी चँटींग तसेच वेळोवेळी फोन करून संभाषण केले.आज दि 24/04/2022रोजी सायंकाळी 18/30वा. चे.सु मला मौजे आमराई बारामती ता बारामती जि पुणे येथे बोलावून माझ्याशी जवळीक करून मला उत्तेजन देण्यासाठी माझ्या जवळ येवून तुम्हाला माझ्या बरोबर येण्यास वेळ आहे का,मी तुम्हाला फलटणला सोडायला येवू का, जाताना आपण लवकर निघू वाटेत आपण कोठेतरी थांबू, थांबण्याचे ठिकाण हॉटेल अगर शेती वगैरे काय माहीत आहे का असे म्हणून माझे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.म्हणून माझी वरील इसमाविरूध्द कायदेशीर फिर्याद आहे. बारामती शहर पोस्टेच्या मपोको माने यांचे समक्ष नोंदविला आहे तो बरोबर असून खरा आहे. दाखल अमंलदार-सफौ रासकर तपासी अंमलदार-सपोनि संकपाळ हे करीत असून तपास चालू असून काळे ला अटक केली आहे.

No comments:

Post a Comment