धक्कादायक.. बारामती व तालुक्यात अवैध दारू विक्री जोरात. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्पष्ट.! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 24, 2022

धक्कादायक.. बारामती व तालुक्यात अवैध दारू विक्री जोरात. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्पष्ट.!

धक्कादायक.. बारामती व तालुक्यात अवैध दारू विक्री जोरात. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्पष्ट.!                                                 बारामती:- बारामती व बारामती तालुक्यातील अवैध धंदे वाढतच चाललेचे दिसून येत आहे अवैध दारू, मटका, गांजा ,गुटखा असे अवैध धंदे चालू असल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे कुणी तक्रार केलीच तर त्या तक्रार करणाऱ्यालाच उलट अडचणी येत असल्याचे कळतंय त्यामुळे कुणी पुढे येण्यास धजावत नाही,समजलेली धक्कादायक माहिती अशी अवैध दारू विक्री करणाऱ्या कडून मासिक हप्ता कुना अडली मार्फत जात असल्याचे सांगतात, राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र याकडे कानाडोळा  करीत असल्याने अनेक वेळा पोलिसांनीच दारूवर कारवाई केल्याची दिसत आहे, करोडो रुपये खर्च करून प्रशासकीय भवन येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असून केवळ मनुष्यबळ कमी असल्यामुळे याठिकाणी असणारे कार्यालय बंद असल्याचे दिसतंय, अनेकांचं संसार उघड्यावर पडले तर अनेकांचा बळी या दारूपायी गेला मात्र अश्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई होत नाही काही अंशी कारवाई झालीच तर त्याची कसोशीने तपास होत नाही कारण छोट्या दारू व्यावसायिकावर कारवाई होते पण त्यांना पुरविणारा डीलर वर कारवाई का होत नाही हा एक चर्चेचा विषय झाला आहे, लवकरच काही सामाजिक संघटना मार्फत व महिला मंडळाच्या वतीने गृहमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे कळतंय, तर नुकताच पोलिसांनी केलेली कारवाई याबाबत माहिती अशी की,वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं  :- 180/2022 मुंबई प्रोव्हिबिशन कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल झाला, विलास महादेव ओमासे पोलीस कॉन्स्टेबल ब.नं. 964 नेमणुक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन जि.पुणे.यांच्या फिर्यादी वरून आरोपी  योगेश साधु जगताप वय-34  रा.बाबुर्डी ता.बारामती जि.पुणे,यास ता.23/04/2022 रोजी 17.30 वा चे सुमारास मौजे लोणीभापकर ता.बारामती जि.पुणे येथे श्रावणी बिअर बारचे आडोश्याला माल मिळाला यावेळी त्याच्याकडे1) 1500/-रु कि. टॅंगो पंच नावाची 90 मिली मापाच्या 50 बाटल्या प्रत्येकी किंमत 30/-रु 
2) 1500/-रु कि.संत्रा नावाची 90 मिली मापाच्या दारुच्या 50 बाटल्या प्रत्येकी किंमत 30/-रु
3) 6400/-रु कि.मॅगडॉल नंबर 1 नावाची विदेषी दारुच्या 180 मिली मापाच्या 40 बाटल्या प्रत्येकी 
             किंमत 160/-रु
4) 6300/-रु कि.आय.बि.नावाच्या 180 मिली मापाच्या विदेषी दारुच्या 42 बाटल्या प्रत्येकी किंमत 150/-रू असा एकूण 
15,700/- रुपयेचा माल आरोपी  हे  ता 23/04/2022 रोजी 17.30 वा चे सुमारास मौजे लोणीभापकर ता.बारामती जि.पुणे येथे श्रावणी बिअर बारचे आडोश्याला इसम नामे योगेश साधु जगताप वय-34  रा.बाबुर्डी ता.बारामती जि.पुणे याने आपले कब्जात वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्हीशन गुन्ह्याचा माल बेकायदा बिगर परवाना बाळगुन त्याची विक्री करीत असताना मिळुन आला म्हणुन त्याचेविरूध्द सरकार तर्फे मुंबई प्रोव्हिबिशन कायदा कलम 65 ई प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे.वगैरे मजकुराची फिर्याद  दाखल करुन पुढील तपास पो.ना. मणेरी हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment