पोलीसांची धडाकेबाज कामगिरी-मोटार सायकल चोरी करणारा घेतला ताब्यात एकूण आठ महागड्या बुलेट एफ झेड सारख्या टू व्हीलर गाड्या केल्या हस्तगत* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 7, 2022

पोलीसांची धडाकेबाज कामगिरी-मोटार सायकल चोरी करणारा घेतला ताब्यात एकूण आठ महागड्या बुलेट एफ झेड सारख्या टू व्हीलर गाड्या केल्या हस्तगत** पोलीसांची धडाकेबाज कामगिरी-मोटार सायकल चोरी करणारा घेतला ताब्यात एकूण आठ महागड्या बुलेट एफ झेड सारख्या टू व्हीलर गाड्या केल्या हस्तगत*

     बारामती:- येथील एमआयडीसी परिसरामध्ये सुभद्रा मॉल ,एमआयडीसी परिसर, महिला हॉस्पिटल या भागांमधून मोटरसायकल चोरी जास्त प्रमाणात होत आहेत म्हणून मोटरसायकल चोरीस आळा बसावा यासाठी या भागात मा. पोलीस निरीक्षक महेश ढवाण साहेब यांनी पोलिसांची गस्त वाढवली होती .दिनांक- 6/4/2022  रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस अंमलदार राम कानगुडे , पोलीस नाईक रणजित मुळीक ,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, दत्ता मदने व नितीन कांबळे हे पेट्रोलिंग करीत असताना सुभद्रा मॉल येथील मोटर सायकल पार्किंग च्या परिसरामध्ये एक इसम संशयित फिरत असताना  मिळून आला त्यास पोलिस स्टेशन येथे आणून  चौकशी केली असता त्याने सुभद्रा मॉल समोरून एक मोटारसायकल चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले सदर बाबतीत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक- 28/2/ 22 रोजी गु. रजि. नं. 115 / 22 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर बाबतीत आरोपीकडे वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करून सखोल चौकशी  केल्यानंतर आणखी सात गाड्यांची  चोरी केल्याचे आरोपी तेजस सदाशिव कदम रा. हिंगणे वाडी ता. इंदापूर जि. पुणे याने कबूल केले आहे .सदरच्या गाड्या या खूप महागड्या आहेत यामध्ये बुलेट, यामाहा, हिरो होंडा युनिकॉर्न ,व एफ झेड यासारख्या गाड्याचा समावेश आहे सर्व गाड्यांची अंदाजे किंमत 8,50000 ते 9,00,000 रुपये आहे या गाड्या पुणे पिंपरी चिंचवड या वेगवेगळ्या भागातून चोरी केल्याचे आरोपी तेजस कदम याने कबूल केले आहे .

   सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक अभिनव जी देशमुख साहेब पुणे ग्रामीण , अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद जी मोहिते  साहेब बारामती,  मा.उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश जी इंगळे साहेब बारामती विभाग मा.पोलीस निरीक्षक महेश ढवाण बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राम कानगुडे पोलीस नाईक रंजीत मुळीक , अमोल नरुटे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, दत्ता मदने व नितीन कांबळे यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलिस नाईक रंजीत मुळीक हे करीत आहेत..

No comments:

Post a Comment