वाफगाव किल्ला सरकारने ताब्यात घ्यावा! विभागीय आयुक्त कार्यलय विधानभवन पुणे येथे १८ एप्रिल रोजी यशवंत ब्रिगेड, होळकर प्रेमी यांच्या वतीने" बेमुदत धरणे आंदोलन" - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 7, 2022

वाफगाव किल्ला सरकारने ताब्यात घ्यावा! विभागीय आयुक्त कार्यलय विधानभवन पुणे येथे १८ एप्रिल रोजी यशवंत ब्रिगेड, होळकर प्रेमी यांच्या वतीने" बेमुदत धरणे आंदोलन"

वाफगाव किल्ला सरकारने ताब्यात घ्यावा! विभागीय आयुक्त कार्यलय  विधानभवन पुणे येथे १८ एप्रिल रोजी यशवंत ब्रिगेड, होळकर प्रेमी यांच्या वतीने" बेमुदत धरणे आंदोलन"

  पुणे:-महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मगाव असलेला वाफगाव तालुका. खेड. जिल्हा पुणे येथील भुईकोट किल्ला हा ऐतिहासिक किल्ला आहे तो राज्य सरकारने ताब्यात घ्यावा हा किल्ला होळकरांनी रयत शिक्षण संस्थेला शाळेच्या कामासाठी त्यातील काही जागा इस.वी सन १९५५ मध्ये वापरण्यास दिली होती परंतु रयत शिक्षण संस्थेने त्या किल्ल्याची काही डागडुजी केली नाही उलट तोडफोड केली आहे त्यामुळे किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रयत शिक्षण संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली असून रयत शिक्षण संस्थेने किल्ल्यातील शाळा इतर सुरू करावी व सरकारने हा ऐतिहासिक किल्ला ताब्यात घ्यावा व याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे रयत शिक्षण संस्थेला व अध्यक्ष शरद पवार यांना महाराजा यशवंतराव होळकर स्मारक समितीने अनेक प्रत्यक्ष भेट घेऊन  पत्रव्यवहार केलेला आहे परंतु यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही महाराजा यशवंतराव होळकर यांचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे भारतामध्येच नव्हे तर अफगाणिस्तान पर्यंत हिंदवी स्वराज्याची पताका अटकेपार झेंडे लावले महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढ्या लढाया झाल्या त्या लढाईमध्ये एकाही लढाईमध्ये पराभूत झाले नाहीत असा हा अपराजित योद्धा त्यांनी भारतातून अक्षरशा इंग्रजांना पळवून लावले त्यामुळे या पराक्रमी राजा चे जन्मस्थानचे राज्य सरकार स्मारक व देखभाल करू शकत नाही हे दुर्दैव आहे. त्यामुळे होळकर प्रेमी मध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे सुभेदार मल्हारराव होळकर यांनी हा किल्ला बांधला आहे त्यामुळे ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे ही सरकारची जबाबदारी आहे हा किल्ला वाचविण्यासाठी यशवंत ब्रिगेड व महाराष्ट्रातील सर्व संघटना होळकर प्रेमींच्या वतीने सोमवार दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता. बेमुदत धरणे आंदोलन विधान भवन पुणे येथे करण्यात येणार आहे तरी सर्व होळकर प्रेमी व समाज बांधवांनी या आंदोलनास उपस्थित रहावे. असे आवाहन यशवंत ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बापूराव सोनवलकर यांनी निवेदनाद्वारे मागणी सरकारकडे केली आहे सदर निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर यांना पाठविले आहे.

 या निवेदनावर बापूराव सोनवलकर, डॉ. उज्वलाताई हाके, भगवानराव जराड, डॉ. स्नेहा सोनकाटे, संपतराव टकले, ॲड.वीणाताई सोनवलकर, वसंतराव घुले, काकासाहेब मारकड, योगेश धरम,  योगेश राजे होळकर, नवनाथ बुळे सरकार, काकासाहेब बुरुंगले, विशाल धायगुडे, सोमनाथ देवकाते, रंगनाथ होळकर, बालाजी सोलनकर, सचिन भोगे, मयूर थिटे, दत्तात्रय गवते, तुकाराम सरोदे आदींच्या निवेदनावर सही आहेत.

No comments:

Post a Comment