धक्कादायक..आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या...! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 17, 2022

धक्कादायक..आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या...!

धक्कादायक..आमदाराच्या पत्नीची राहत्या घरी आत्महत्या...!
मुंबई:- नुकताच धक्कादायक बातमी समजली, कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. रजनी यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मंगेश यांच्या पत्नी रजनी यांच्या आत्महत्येची बातमी समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या नेमकी
का केली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने
मतदारसंघातील नागरीकांना धक्का बसला आहे.
रजनी यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद असल्याची चर्चा सुरु आहे. पण त्याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. कुल्ल्याच्या नेहरुनगर परिसरात कुडाळकर कुटुंब वास्तव्यास आहे. नेहरु नगरमधील राहत्या घरीच रजनी यांनी आत्महत्या केली. रजनी यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीिस कुडाळकर यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना रजनी यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

No comments:

Post a Comment