उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ओम एंटरप्राईजेस च्या नवीन शॉप चे उदघाटन संपन्न - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, April 18, 2022

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ओम एंटरप्राईजेस च्या नवीन शॉप चे उदघाटन संपन्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  ओम एंटरप्राईजेस च्या नवीन शॉप चे उदघाटन संपन्न 


बारामती :- बारामती ,भिगवण रोड येथे     ल्युमिनस ,टाटा ग्रीन कंपनी च्या बॅटरीज,इन्व्हर्टर ,सोलर पॉवर सिस्टिम च्या  ओम एंटरप्राईजेस च्या नवीन शॉप चे भव्य उदघाटन आज दिनांक १७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. अजित पवार यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडले .  कार्यक्रमाचे चे ठिकाण सनशाइन प्लाझा ,भिगवण रोड ,डोमिनोज पिझ्झा समोर ,बारामती येथे आहे.
या  कार्यक्रमास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ,मा.जि .प. अध्यक्ष विश्वास देवकाते ,  ल्युमिनस कंपनी चे  रिजनल सेल्स मॅनेजर विभव भार्गव व टीम ,तसेच टाटा कंपनी चे व्हाईस प्रेसिडेंट अनिल भामरे ,ओंकार टेन्को,पुणे चे सौ.स्मिता व शिरीष नगरकर  , मा .जि.प.बांधकाम सभापती भाऊसाहेब करे ,बारामती इंडस्ट्रीयल मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन  चे धनंजय जामदार , बारामती मा.नगरसेविका नीलिमा मलगुंडे ,फलटण मा.नगरसेविका वैशाली चोरमले , यांच्या सह अनेक वकील ,डॉक्टर्स ,पत्रकार ,उद्योजक व्यावसायिक , युवा बंधू - भगिनी   आदी  मान्यवर यावेळी उपस्थित होते . मा.विक्री कर उपायुक्त प्रशांत नाना सातव , मा.नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी ही उपस्थिती दर्शवली .

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे  यांचे  सौ.कल्याणी वाघमोडे व महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केले.
फीत कापून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते ओम एंटरप्रायजेस या नवीन व्यवसायाचे उदघाटन करण्यात आले . यावेळी अजितदादा यांनी जिज्ञासू वृत्तीने व्यवसायाची माहिती घेतली . कार्यक्रमाचे प्रस्तावना   ओम  एंटरप्रायजेस च्या कल्याणी वाघमोडे यांनी केली . 
यावेळी कल्याणी वाघमोडे यांनी व्यवसायबद्दल थोडक्यात संदर्भ माहिती देत असताना व्यवसाय उभारणी करून युवकांना रोजगार उत्पन्न व्हावा यासाठी बारामती मध्ये आय टी हब , सोलर पॉवर हब व्हाव्यात ,अशी अपेक्षा व्यक्त केली .तसेच महाराष्ट्रात जनतेला , शेतकरी वर्गाला वीजकपातीच्या संकटाना सामोरे जावे लागते ,त्यासाठी  मोठया प्रमाणात सोलर पॉवर हब उभे राहायला हवेत ,असे निर्देश संबंधित मंत्र्यांना द्यावेत ,अशी विनंती करून कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले .

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा  पवार यांनी वेळ देत भाषणात कल्याणी व डॉ.सुजित वाघमोडे यांच्या कामाचे कौतुक केले व नवीन व्यवसायास शुभेच्छा दिल्या .
सोलर पॉवर सिस्टिम चे महत्व ,विजेचा वापर ,वीज बजत याबाबत नागरिकांना महत्व पटवून दिले .  शिर्सुफळ ,गुजरात ,सौराष्ट्र मधील सोलर पॉवर चे उदाहरण दिले .डॉक्टर सुजित वाघमोडे यांनी आभार व्यक्त केले . ज्ञानेश्वर जगताप ,सलीम सय्यद ,ज्ञानेश्वर  बुरूंगले सर यांनी सूत्रसंचालन केले .

No comments:

Post a Comment