नवतंत्रज्ञानाच्या मदतीने द्विशिक्षकी शाळा परिपूर्ण शिक्षण देऊ शकतातयशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय परिषदेतील मत - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 2, 2022

नवतंत्रज्ञानाच्या मदतीने द्विशिक्षकी शाळा परिपूर्ण शिक्षण देऊ शकतातयशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय परिषदेतील मत

नवतंत्रज्ञानाच्या मदतीने द्विशिक्षकी शाळा परिपूर्ण शिक्षण देऊ शकतात
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय परिषदेतील मत
 - शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या यशस्वी फेलोंची घोषणा
- शरद पवार, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांची परिषदेला उपस्थीती
मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) – नवतंत्रज्ञानाच्या मदतीने द्विशिक्षकी शाळा परिपूर्ण शिक्षण देऊ शकतात. त्यामुळे या शाळांच्या बाबतीत शासनाने देखील आपली भूमिका बदलावी आणि त्या शाळांना चालना द्यावी, असे मत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत व्यक्त करण्यात आले. या परिषदेतच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन' च्या फेलोंची नावे आज स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीत खासदार सुळे यांनी घोषित केली.  

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शाळांची ओळख शिक्षकांनी राबवलेल्या  धोरणावर ठरत असते. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी आज आणि उद्याही शिक्षकाला पर्याय नाही त्यामुळे नव्या साधनांचा वापर करताना शिक्षक हाच केंद्रबिंदू ठेऊन काम करायला हवे. त्याचबरोबर शाळांसाठी क्लस्टर संकल्पनेचा वापर करायलाय हवा.” हे सांगताना सुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शाळा आणि तेथे शासकीय अधिकाऱ्याने राबविलेल्या उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला. फेलोशिपसाठी निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतानाच ज्यांची निवड झाली नाही, त्यांनी पुन्हा अर्ज करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "आजवर शिक्षण क्षेत्रात अनेक नवनवीन धोरणं जाहीर झाली आहेत. पण प्रत्यक्ष राबवताना मात्र अनेक कारणांनी त्यात पुर्ण यश मिळाले नाही. आजवर शिक्षण क्षेत्रासाठी लोकसहभाग ही संकल्पना वापरण्यात आली,  पण आता ‘लोकांचा पुढाकार’ ही संकल्पना शाळेच्या सशक्तीकरणासाठी महत्वाची ठरणार आहे. शिक्षकांना स्वायत्तता दिली, तर ते अधिक चांगल्या प्रकारे काम करु शकतात. द्विशिक्षकी शाळांमध्ये तर कामासाठी त्यांना खूप मोठा वाव मिळू शकतो. शासनानेही या शाळांच्या बाबतीत आपली भूमिका बदलावी आणि त्या शाळांना चालना द्यावी."

एमकेसीएलचे मुख्य मेंटॉर विवेक सावंत यांनी सादरीकरणासह विचार मांडले. ते म्हणाले, “नव्या शिक्षण धोरणात देशात एक लाख ‘एक शिक्षकी’ शाळा आहेत. पण त्या बद्दल वेगळी माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे चव्हाण सेंटरच्या माध्यमातून यावर आपण चांगले काम करु शकू असा विश्वास वाटल्याने परिषदेसाठी हा विषय घेतला आहे. मोठ्या शाळा सुरू करण्यापेक्षा द्विशिक्षकी शाळांच्या माध्यमातून आपण परिपूर्ण शिक्षण देऊ शकतो. तंत्रज्ञान आपल्या मदतीला असणार आहे. त्यामुळे या शाळांना चालना द्यायली हवी." 

डॉ. अनिल काकोडकर,  डॉ. विवेक सावंत,  यांच्यासह शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे सह निमंत्रक व यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई चे कोषाध्यक्ष हेमंत टकले, शिक्षण विकास मंचच्या डॉ. बसंती रॉय यांच्यासह राज्यातील विविध भागातून आलेले शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते. 

संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनी फेलोशिपसाठी अर्ज केले होते. त्यांपैकी प्राथमिक विभागातील दहा आणि माध्यमिक विभागातील दहा अशा वीस यशस्वी शिक्षकांची नावे निवडण्यात आली आहेत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. निवड झालेल्या सर्व फेलोंचे अभिनंदन करतानाच ज्यांची निवड झाली नाही, ते पुन्हा अर्ज करू शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली. 

निवड झालेल्या फेलोंची पुढील प्रमाणे : 
प्राथमिक विभाग शिक्षक : 
सोमनाथ वामन वाळके, प्रवीण दत्तात्रय शिंदे, वर्षा विशाल गायकवाड, जगदीश श्रीकृष्ण कुडे, गजानन निवळे, रामकृष्ण वाटेकर, राजकिरण आत्माराम चव्हाण, किशोर मोतिराम भागवत, कृष्णा खंडू कुदळे, उमेश रघुनाथ खोसे

माध्यमिक विभाग शिक्षक : 
नंदकिशोर तुकाराम बोकडे, कृष्णात दामोदर जाधव, अतुल बाळकृष्ण सवाखंडे, पूनम लक्ष्मण पाटील, रामू सिताराम जाधव, विवेक गुणवंतराव चव्हाण, डॉ. सोमनाथ श्रीरंग राऊत, शिवानी सचिन लिमये, मंगेश कडलग, शिल्पा किशोर पाटील – भोंडे 

अधिक माहितीसाठी https://www.sharadpawarfellowship.com/result/education-result
या वेबसाईटला भेट द्यावी. 

या फेलोशिपच्या सल्लागार समितीमध्ये श्री विवेक सावंत, डॉ. वसंत काळपांडे, उषा राणे, डॉ. हेमचंद्र प्रधान, निलेश निमकर, डॉ. सुरेश सावंत, सुषमा शर्मा, डॉ.अ. ल. देशमुख हे शिक्षण क्षेत्रातील दिग्गज  असून फेलोंची निवड करण्यासाठी नामदेव माळी - मिरज, डॉ. गणपती कमळकर - कागल, संदीप पवार - जरेवाडी, अमरजा जोशी - पुणे, कमलाकर महामुनी - पुणे, आदिती नातू - पुणे , रमेश ठाकूर - औरंगाबाद, समशुद्दीन आत्तार - सिंधुदुर्ग, संजीव अक्कलकोटे - सोलापूर, प्रतिभा भराडे - सातारा, जे. के. पाटील - जळगाव, राजश्री साळगे - मुंबई, दीपिका गावडे - मुंबई, डॉ. माधव सूर्यवंशी - मुंबई, योगेश कुदळे - इस्लामपूर, डॉ. वर्षा कुलकर्णी - कराड यांच्या निवड समितीने काम पाहिले.

No comments:

Post a Comment