*ईद निमित्त सातव परिवाराच्या वतीने सतराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य वाटप*...! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 2, 2022

*ईद निमित्त सातव परिवाराच्या वतीने सतराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य वाटप*...!

*ईद निमित्त सातव परिवाराच्या वतीने सतराशे  कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य वाटप*...!

 _सातव कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी..!_ 

 _सलग तिसऱ्या वर्षी शिर्रखुमा कीट वाटप.._ बारामती: मुस्लिम बांधवांची रमजान ईद गोड व्हावी, यासाठी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन, गटनेते सचिन सातव व नगरसेवक सूरज सातव व माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांच्या वतीने ईद निमित्त सतराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार माजी. नगराध्यक्ष सदाशिव बापुजी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या शुभहस्ते किट वाटपाची सुरुवात करण्यात आली. सचिन सातव, सुरज सातव व  नितीन सातव यांनी सलग तिसऱ्या वर्षी देखील सतराशे कुंटबांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप उपक्रम हाती घेतला आहे. सातव कुटुंबियांचा नेहमीच सामाजिक कार्यामध्ये एक हात पुढे असतो. सदर कीट वाटप करून सातव कुटुंबीयांनी पुन्हा एकदा सामाजि बांधिलकी जपली आहे. 


सदर किटसाठी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी साखर दौंड शुगर मार्फत व दुध बारामती दूध संघा मार्फत दुधाची सोय करण्यासाठी सूचना केल्या दरम्यान यावेळी सबंध मुस्लिम बांधवांनी अजित पवार व सातव कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले आहे.

या प्रसंगी पत्रकार मन्सूर शेख,फिरोज सय्यद,आक्रम बागवान,फिरोज शेख, निहाल शेख,रियाज बेग,जुबेर अत्तार,
अभिजित ढवान,अझर मोमिन,समीर शेख,अनिस मोमिन,जमीर शेख,करीम तांबोळी,सलीम मुजावर,सिकंदर शेख,दाऊद शेख,जमीर इनामदार,तनवीर इनामदार,सागर खलाटे उपस्थित होते.तर नगरसेविका डॉ सुहासिनी सातव , नगरसेवक संतोष जगताप , नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मुस्लिम बांधवांना बरोबर घेऊन घरोघरी जाऊन साहित्य वाटपाचे नियोजन केले.

No comments:

Post a Comment