मांदळेवाडी येथे काल्याच्या किर्तनात ह.भ.प.पुरुषोत्तम( दादा) महाराज पाटील यांचे सांगता समारोप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 7, 2022

मांदळेवाडी येथे काल्याच्या किर्तनात ह.भ.प.पुरुषोत्तम( दादा) महाराज पाटील यांचे सांगता समारोप..

मांदळेवाडी  येथे काल्याच्या किर्तनात ह.भ.प.पुरुषोत्तम( दादा) महाराज पाटील यांचे सांगता समारोप..                                निरगुडसर : (प्रतिनिधी-प्रतिक अरुण गोरडे):-आजचा तरुण वर्ग अध्यात्माकडे वळला आहे. हि मोठी गौरवाची व कौतुकाची बाब आहे.त्यामुळे या तरुण वर्गाने आपल्या आईवडीलाच्या सेवेत परमेश्वर शोधला पाहिजे असे प्रतिप्रादन मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे काल्याच्या किर्तन सेवेत ह.भ.प.पुरुषोत्तम (दादा ) महाराज पाटील (आळंदी) यांनी केले. मांदळेवाडी येथे श्री हनुमान मंदिराच्या वर्ष २८ व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यावेळी काल्याच्या सांगता समारोप प्रसंगी पाटील बोलत होते. या हरिनाम सप्ताहाचे वैशिष्टये म्हणजे दररोज हरिकिर्तनानंतर संपूर्ण गावाला सातही दिवस महाप्रसाद दिला जात होतो. तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक आदर्श हरिनाम सप्ताह म्हणून ओळखला जातो. सप्ताह काळात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते.या अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन समस्त ग्रामस्थ मांदळेवाडी, मुंबई, पुणेकर मंडळीनी केले होते.

No comments:

Post a Comment