*अवैध धंदे बंद करा, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांना भेटून केली मागणी!* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 7, 2022

*अवैध धंदे बंद करा, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांना भेटून केली मागणी!*

*अवैध धंदे बंद करा, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पोलीस आयुक्तांना भेटून केली मागणी!*

*पुणे:-  विस्तारलेल्या पुणे शहरात सर्वत्र वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित गैरव्यवहार वाढलेले दिसत आहेत. आजच्या काळामध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसेवियर इंजेक्शनचा झालेला लाखो करोडो रुपयांचा काळाबाजार लोक अद्याप विसरलेले नाहीत. त्यावेळी पोलीस कारवाई आणि फौजदारी शिक्षा गांभीर्याने झाल्या नाहीत म्हणून वैद्यकीय क्षेत्रात अवैद्य धंदे वाढलेले दिसत आहेत. यावर वेळीच पायबंद घातला पाहिजे. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध प्रवृत्तींवर तात्काळ आळा घालावा म्हणून विविध मागण्यांचे निवेदन आज रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना समक्ष भेटून दिले, यावेळी सविस्तर साधक-बाधक चर्चा झाली. 
      पुण्यातील विविध भागांमध्ये सध्या अधिकृत दवाखाने, विनापरवाना हॉस्पिटल आणि विनापरवाना गर्भपात केंद्र जोरदार सुरू आहेत. अनेक गुंड आणि गुन्हेगारांनी बांधलेल्या अनधिकृत असलेल्या इमारतींमध्ये विनापरवाना दवाखाने आणि डायग्नोस्टिक सेंटरचे फर्निचर उभे करून खरोखरच हुबेहूब हॉस्पिटल किंवा डायग्नोस्टिक सेंटर वाटावे, अश्या पद्धतीने लोकांच्या जिवाशी खेळण्याचे उद्योग सुरू आहेत.   यामध्ये अनेक लोभी डॉक्टर अनधिकृत, विना परवाना गर्भपात केंद्र पुण्यातील बहुतांश भागात चालवित आहेत, वेगवेगळे उपचार करीत आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, याची पुराव्यांसह फाईल रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिली.
        हॉस्पिटल उभे करून देतो या नावाखाली अनधिकृत जागेत विनापरवाना हॉस्पिटल उभे करून लोकांशी फसवणुकीचे व्यवहार करून, लोकांना लुबाडून, खोटी कागदपत्रे तयार करून फसवणारी गुंड गुन्हेगारांची टोळी बांधकाम क्षेत्राला बदनाम करीत आहे. यातून वैद्यकीय क्षेत्राचीही बदनामी होत आहे. याकडेही उमेश चव्हाण यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे लक्ष वेधले.
        ज्याअर्थी, इतर समस्या निवारणासाठी तयार केलेल्या तक्रार निवारण कक्षांप्रमाणेच वैद्यकीय क्षेत्रातील गैव्यवहारप्रकरणी तक्रार देण्यासाठी सुद्धा स्वतंत्र कक्षाची पुणे पोलीस आयुक्तांनी उभारणी करावी, अशी प्रमुख मागणी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय कार्यालय सचिव संजय जोशी आणि पुणे शहर अध्यक्ष अपर्णाताई साठे उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment