बेल्हा जेजुरी महामार्गा वरचे अपघात सत्र काही थांबेना...
--------------------------------
पारगाव प्रतिनिधी (पियुष गायकवाड) :-खडकवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे. ता.२०
बेल्हा -जेजुरी रोड पुण्यावरून अकोले याठिकाणी जात असलेली ईरटीगा गाडी एम एच१२एस एल ०४६० गाडी मालक अंकुश जाधव हे स्वतः चालत असताना गाडीचा ताबा सुटल्याने खडकवाडी येथील वळणावर गाडी पलटी झाली असून, अंकुश जाधव यांना किरकोळ दुखापत झाली. यावेळी तुषार आवटे खडकवाडी गावचे ग्रामस्थ गुलाब वाळुंज वैभव सुक्रे, अरविंद वाळुंज, गणेश सुक्रे, यांनी घटनास्थळी जाऊन सहकार्य केले मा.सरपंच अनिल डोके, उपसरपंच एकनाथ सुक्रे ,यांनी अशी माहिती दिली. प्रशासनाने लक्ष देवुन रस्त्यावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावे, रोजच रोडेवाडी ते खडकवाडी .लोणी पाबळ दरम्यान अपघात प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कारण वाहतूक दिवसेंदिवस रस्ता चांगला असल्याने वाढत आहे. प्रशासनाने लक्ष द्यावे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन या बाबतीमध्ये चालढकल करत आहे. त्यामुळे लोकांचा आक्रोश वाढत आहे. संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर स्पीडब्रेकर दिशादर्शक फलक बसवावेत अशी मागणी, सरपंच कमल ताई सुक्रे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment